आणखी एका राज्यातील कॉंग्रेस सरकार कोसळले !

0

पुद्दुचेरी: पुडुचेरीमध्ये काँग्रेसला मोठा झटका लागला आहे. सहा आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे अल्मपतात आलेले पुदुचेरीतील काँग्रेस सरकार अखेर कोसळले आहे. पुडुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यात अपयश आलं. त्यानंतर पुडुचेरीतील सरकारल कोसळलं. पुडुचेरी विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री नारायणसामी बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याची घोषणा केली. त्यानंतर मुख्यमंत्री नारायणसामी यांनी उपराज्यपालांना आपला राजीनामा सोपवला.

 

व्ही. नारायणसामी यांचे सरकार विश्वासदर्शक ठराव हरल्यानंतर पुदुचेरीची विधानसभा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. काँग्रसचे आमदार लक्ष्मीनारायण आणि डीएमकेचे आमदार वेंकटेशन यांनी रविवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. यापूर्वी काँग्रेसच्या चार आमदारांनी पक्षाला रामराम ठोकला होता. या दोन आमदारांच्या राजीनाम्यामुळे 33 सदस्यीय विधानसभेत काँग्रेस-डीएमके आघाडीच्या आमदारांची संख्या घटून 11 झाली आहे. तर विरोधी पक्षाच्या आमदारांची संख्या 14 झाली होती.

 

एप्रिल-मे दरम्यान विधानसभा निवडणूक

या सगळ्या उलथापलथीनंतरही मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी सरकार बहुमतात असल्याचा दावा केला होता. एप्रिल-मे महिन्यात पुद्दुचेरी विधानसभा निवडणूक होत आहे. त्यापूर्वी तिथे मोठ्या राजकीय हालचाली होताना पाहायला मिळत आहेत. पुद्दुचेरी विधानसभेत काँग्रेसचे 10, DMK 3, ऑल इंडिया एन आर काँग्रेस 7, AIDMK 4, भाजप 3 तर 1 अपक्ष आमदार आहे. काँग्रेसच्या 4 आमदारांनी राजीनामा दिला आहे. तर एक आमदार अपात्र ठरला होता. पुद्दुचेरी विधानसभेत बहुमताचा आकडा 15 आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.