निपाणे वि.का.सोसायटीच्या सदस्यपदी संजय पाटील यांची बिनविरोध निवड

0

निपाणे ता एरंडोल (वार्ताहर) : निपाणे येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ची मासिक मिटींग दि, २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ठिक ९-३० वाजता संस्थेच्या कार्यालयात चेअरमन दिनेश उत्तमराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

 

यावेळी सर्वानुमते रिक्त सदस्य पद भरण्यात येवून संजय श्रावण पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी सुचक म्हणून धर्मराज नथ्थू पाटील यांनी सुचना मांडली तर त्यास देविदास रघूनाथ महाजन यांनी अनुमोदन दिले.

 

माजी चेअरमन लहू मन्साराम पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्यामुळे एक सदस्य पद रिक्त झाले होते.यावेळी संस्थेचे चेअरमन दिनेश पाटील व्हाईस चेअरमन दिलीप ठाकूर  डॉ, भास्कर महाजन धर्मराज पाटील सुभाष बियाणी महादू पाटील  लक्ष्मण पाटील पंडित महाजन देविदास महाजन सौ, मंगलबाई शरद पाटील सौ, लताबाई रविंद्र चौधरी सचिव मधूकर शांताराम पाटील शिपाई जिजाबराव राजाराम पाटील आदी उपस्थित होते यावेळी एकमेकांना गुलाल लावून आनंद व्यक्त  करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.