भडगाव वॉर्ड क्र.6 मधील दुर्लक्षित

0

भडगाव – प्रतिनिधी

भडगाव शहरातील वार्ड क्र.6 कराब या आदिवासी भिल्ल समाजाच्या वस्तीच्या बाजूला स्मशानभूमीची दैंननीय अवस्था झाली होती. या ठिकाणी काटेरी झाडे, झुडपे, जाण्यासाठी रस्ता नाही, खड्डे या अश्या समस्या भिल्ल समाजाच्या स्मशानभूमी परिसरात होत्या. दि.19 रोजी माजी शहर प्रमुख मनोहर चौधरी यांनी स्वखर्चातून साफसफाई, रस्ता, समांतर कराब आदिवासी भिल्ल समाजाची स्मशानभूमी तील काटेरी झुडपे तोडून साफसफाई व स्वच्छता करत सामाजिक बांधिलकी जपली आहे. या वेळी माजी शिवसेना शहर प्रमुख मनोहर चौधरी,बारकू बाबा, अशोक नाईक, परेश सोनवणे, सतीश सोनवणे, किसन भिल, रवींद्र मोरे ,मनोज सोनवणे, संतोष सूर्यवंशी ,अमोल भिल ,शिवाजी सोनवणे, चेतन सोनवणे, युवासेना शहरप्रमुख निलेश पाटील, माधव जगताप,संदीप बोरसे, नरेंद्र सूर्यवंशी, निंबा नाईक, प्रकाश नाईक, पप्पू पाटील, निलेश पाटील, सतीश गांगुर्डे, शिवराम सोनवणे, आदी उपस्थित होते. तसेच येत्या काही दिवसात या ठिकाणी आमदार निधीतून संरक्षण भिंत बांधण्यात येणार असल्याचे मनोहर चौधरी यांनी दैनिक लोकशाही ला सांगितले.अनेक वर्षांपासून प्रलंबित व दुर्लक्षित भागात व्यक्तिगत खर्चाने सुरू केल्यामुळे या कामामुळे कराब भागात समाधान व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.