🤔आश्चर्यकारक भविष्य……

0

कार दुरुस्त करणारी वर्कशॉप काही काळानंतर बंद होतील.

विजेवर चालणाऱ्या वाहनात 50 पेक्षा कमी भाग असतात. त्या ठिकाणी पेट्रोल किंवा डिझेल या अशा कारमध्ये जवळपास वीस हजार छोटे छोटे भाग असतात

विजेवरच्या कार्सची आयुष्याची हमी भविष्यात मिळेल.काही मिनिटांत बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांमध्ये विजेवर चालणारी मोटार बदलता येतील

विजेवर चालणाऱ्या मोटारी बिघडल्यानंतर यंत्रमानव असलेल्या कार्यशाळेत दुरुस्त होतील. नेहमीच्या कार्यशाळेत दुरुस्त होणार नाहीत.

तुमची विजेवर चालणारी गाडी जर बिघडली तर एक दिवा सतत चालू राहील. तुमची गाडी ओढत कार्यशाळेत घेऊन जातील आणि तुमचा चहा पिऊन होईल तोपर्यंत बिघडलेली गाडी दुरुस्त झालेली विजेवरची गाडी बाहेर येईल!!!

भविष्यात पेट्रोल पंप असणारच नाहीत.

युरोप मधल्या काही देशाप्रमाणे कोपऱ्या-कोपऱ्यावर बॅटरी चार्ज करून मिळणारी दुकाने असतील.

होंडा, टोयोटा, सॅमसंग यासारख्या कारखानदारांनी विजेवर चालणाऱ्या कार्स बनवण्यासाठी अब्जावधी डॉलरची गुंतवणूक केलेली आहे.

भविष्यात कोळशाच्या खाणी पूर्णपणे बंद पडतील. पेट्रोलच्या कंपन्या बंद होतील. तसेच जमिनीखालचे तेल काढण्यासाठीचे खोदकाम बंद होईल. यामुळे मध्यपूर्वेला धोका आहे. अरब देशातील नागरिकांना नुसता खजूर खावा लागू शकतो.

घरावर बसविलेल्या सौरशक्ती च्या पॅनल द्वारे भरपूर वीज उपलब्ध होईल. साठवलेली वीज कंपनीला विकता येईल. ती वीज जास्त वीज लागणाऱ्या कंपन्या वापरू शकतील. आणि आपल्याला विजेचे बिल येणारच नाही.

वस्तुसंग्रहालयात व्यक्तिगत कार्स दिसतील.

सन 2000 मध्ये असे वाटले ही नाही ही की पाच वर्षांनी फोटोग्रफिक रोल्सवर कोणी फोटो घेणार नाही. वीस वर्षांनी फोटो फक्त स्मार्ट फोनवरच काढले जात आहेत. फक्त तज्ञ लोक मोठा कॅमेरा बाळगतात.

1975 मध्ये डिजिटल कॅमेरा शोधला गेला. त्यावेळी त्याचे रेझ्युलेशन फक्त दहा हजार पिक्सेल होते. आणि आता 100 मेगापिक्सल इतके झाले आहे. आणि भविष्यातील सर्व तंत्रज्ञान अशीच उड्डाणे घेत राहणार आहे.

येथून पुढे विजेच्या कार स्वतः चालतील. चालक लागणार नाही. कृत्रिम प्रज्ञा अधिक अधिक वेगाने सुधारत जाईल. त्यामुळे वैद्यकीय उपकरणे अधिक शहाणी होऊन तपासणी सोपी होईल.

या पुढील सर्व शिक्षण संगणकावर होईल. थ्री D छपाई येईल तसेच शेती विज्ञानात देखील प्रचंड प्रगती होईल.

चालक विरहित कार

जूनी खूप गाजलेली कादंबरी “फ्यूचर शॉक” विसरावी लागेल. चौथी औद्योगिक क्रांति येत आहे.

कृत्रिम प्रज्ञा, यंत्र मानवी उद्योग, 3d छपाई, सौर विद्युत, वीजेवर चालणारी विमाने, दूर पल्ल्याच्या बस ऐवजी वीजेवरचे ड्रोन्स, सर्वांना मुक्त वीज!! वीज फूकट झाल्यामुळे प्लास्टीक नष्ट करता येणार, कदाचित प्लास्टीकचे रूपांतर करण्याचे तंत्रज्ञानही विकसित होईल! आणखीन काय? फक्त कल्पना……..!!

2040 पर्यंत विजेवरची वाहने सर्वसामान्य होतील. त्यातून प्रवास हा मुक्त आणि अल्पदरात असेल. त्यामुळे खाजगी वाहने असणारच नाहीत. त्यामुळे प्रदूषण नाही. तसेच वाहने ठेवण्यासाठी वाहनतळ असणार नाही.

सर्व वाहने विजेवरची असल्यामुळे शहरे तसेच ग्रामीण भागात पर्यावरण स्वच्छ असेल की जिथे प्रदूषण असणारच नाही.

वीज फुकट असल्यामुळे प्लास्टिक कचरा असणार नाही तो जाळून टाकला जाईल. कारण त्याचा खर्च असणार नाही. स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी असेल.

ऊर्जेसाठी दोन स्त्रोत असणार आहेत एक आहे तो सौर शक्ती जी कधीच संपणार नाही त्यात सतत सुधारणा होत असल्यामुळे सौरशक्ती वरची पॅनल्स स्वस्त होणार आहेत व अधिक शक्तिशाली होणार आहेत. तसेच बॅटरीज मध्ये खूप सुधारणा झाल्यामुळे त्यांत साठवली जाणारी वीज अधिकाधिक होईल, जी कोणत्याही कुटुंबाच्या गरजेपेक्षा जास्तच असेल.

शारीरिक तंदुरुस्तीसाठी फक्त बायसिकलस मात्र खूप मोठ्या प्रमाणात असणार. उंच इमारतीमध्ये 24 तास उद्वाहन असणार.

अणुभट्टी आणि इंधन

नवीन संशोधनाद्वारे अणुभट्टीतील वापरून झालेले अणू इंधन, त्यातून वीज निर्मिती करणे शक्य होणार आहे. ही अणू इंधन वीज पुढील पाच वर्षात सर्वांना उपलब्ध होईल. त्यावर तयार होणाऱ्या बॅटरीचे आयुष्य 28हजार वर्षे असेल.

मोबाईल फोनची बॅटरी आयुष्यभरासाठी असेल. बॅटरी बदलवण्याची गरज राहणार नाही. त्यातच आणखीन आणखीन उपकरणे (सेन्सर्स) येतील, जे आपल्या शारीरिक तंदुरुस्ती बद्दल पूर्ण माहिती देतील. त्याआधारे आपण वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घेऊ शकू.

असं असू शकतं का? असं होऊ शकत का? सध्या सुरू असलेली सर्व उठाठेव आणि भूतकाळ पाहता…… होय , असच पुढचं भविष्य राहणार आहे असाच विचार करावा लागणार आहे. नव्या युगाच्या स्वागताला सज्ज होऊ

Leave A Reply

Your email address will not be published.