यावल जवळ अपघात पंधरा जागीच ठार – मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

1

यावल/रावेर/फैजपूर प्रतिनिधी –  यावल तालुक्यातील किनगावजवळ पपई भरून येणारी आयशर मेटेडोर उलटली आहे. यात १५ मजूरांचा मृत्यू झाल्याचे कळत आहे. डी वाय एस पी पिंगळे यांनी याला दुजोरा दिला आहे. अपघातात दोन जण गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

या बाबत वृत्त असे की, धुळे येथून चोपडा मार्गे रावेरला जाणा-या आयशर वाहन क्र. (एमएच  १९ झेड३५६८)चा गुल्ला तुटल्याने वाहन उलटून अपघात झाला. आयशर ट्रक चालक शेख जहीर शेख बद्रुद्दिन ( रा.मोमिनपुरा रावेर)  यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मृतांना यावल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहेत. दरम्यान या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघाताची माहिती मिळताच डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांनी अपघातस्थळ गाठले असून त्यांनी त्यांनी अपघाताबाबत दुजोरा दिला आहे.

घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे, येथील पोलिस निरीक्षक सुधिर पाटील यांनी भेट दिली असून येथील ग्रामीण रुग्णालयात प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी भेट दिली. दरम्यान भुसावळ चे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी येथे ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले व वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बी बारेला यांना निष्काळजीपणा बद्दल खडे बोल सुनावले.

अपघातात मृत झालेल्यांचे मृतदेह यावल येथील ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आलेली आहेत. तर जखमींवर उपचार सुरू आहेत.

मयताचे नाव
1)शेख हुसेन शेख मुस्लिम मन्यार वय 30 रा फकीर वाडा रावेर-
2)सरफराज कासम तडवी वय 32 रा के-हाळा
3)नरेद्र वामन वाघ वय 25 रा आभोडा
4) डिंगबर माधव सपकाळे वय 55 रा रावेर-
5)दिलदार हुसेन तडवी वय 20 आभोडा-
6)संदीप युवराज भालेराव वय 25 रा विवरा
7) अशोक जगन वाघ वय 40 रा आभोडा –
8)दुर्गाबाई संदीप भालेराव वय 20 रा आभोडा
9)गणेश रमेश मोरे वय 05 वर्ष रा आभोडा –
10) शारदा रमेश मोरे वय 15 वर्ष रा आभोडा-
11) सागर अशोक वाघ वय 03 वर्ष रा आभोडा –
12) संगीता अशोक वाघ वय 35रा आभोडा –
13) सुमनबाई शालीक इंगळे वय 45 रा आभोडा-
14) कमलाबाई रमेश मोरे वय 45 रा आभोडा –
15) सबनुर हुसेन तडवी वय 53 रा आभोडा –

Leave A Reply

Your email address will not be published.