दहावी, बारावी पास आहात का? भारतीय हवाई दलात विविध पदांसाठी भरती सुरु

1

नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेत ग्रुप सी च्या अनेक असैनिक पदांवर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. दहावी, बारावी उत्तीर्णांपासून पदवीधरांपर्यंत प्रत्येकासाठी नोकरीची संधी आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

ही भरती वायु सेनेच्या साउथ वेस्टर्न एयर कमांड हेडक्वार्टर अंतर्गत होणार आहे. अधिकृत नोटिफिकेशन आणि अर्ज पुढे देण्यात आले आहेत.

एकूण जागा : २५५

पदाचे नाव & पद संख्या

1 मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) 61

2 हाउस कीपिंग स्टाफ (HKS) 49

3 मेस स्टाफ 47

4 निम्न श्रेणी लिपिक (LDC) 11

5 लिपिक हिंदी टायपिस्ट 02

6 स्टेनोग्राफर ग्रेड-II 04

7 स्टोअर (सुपरिंटेंडेंट) 03

8 स्टोअर कीपर 03

9 लाँड्रीमन 09

10 आया/वार्ड सहाय्यिका 01

11 कारपेंटर 03

12 पेंटर 04

13 व्हल्केनिझर 02

14 सिव्हिलियन मेकॅनिकेल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर 07

15 कुक (सामान्य श्रेणी) 41

16 फायरमन 08

 

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: 10वी उत्तीर्ण.

पद क्र.2: 10वी उत्तीर्ण.

पद क्र.3: 10वी उत्तीर्ण.

पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) इंग्रजी टाइपिंग 30 श.प्र.मि. किंवा संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि.

पद क्र.5: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) हिंदी टाइपिंग 25 श.प्र.मि. किंवा संगणकावर इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि.

पद क्र.6: (i) 12वी उत्तीर्ण    (ii) डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी).

पद क्र.7: पदवीधर

पद क्र.8: 12वी उत्तीर्ण

पद क्र.9: 10वी उत्तीर्ण.

पद क्र.10: 10वी उत्तीर्ण.

पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण.  (ii) ITI (कारपेंटर)

पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण.  (ii) ITI (पेंटर)

पद क्र.13: 10वी उत्तीर्ण.

पद क्र.14: (i) 10 वी उत्तीर्ण  (ii) अवजड व हलके वाहनचालक परवाना  (iii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.15: (i) 10 वी उत्तीर्ण  (ii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.16: (i) 10 वी उत्तीर्ण  (ii) फायर फाइटिंगचे प्रशिक्षण घेतले असावे

वयाची अट: 15 मार्च 2021 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

कसा कराल अर्ज?

भारतीय वायुसेनेच्या या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करावा लागेल. अर्ज नोटिफिकेशनसोबत देण्यात आला आहे. अर्ज संपूर्ण भरून पाकिटात भरून नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे. पाकिटावर दहा रुपयांचा पोस्टल स्टॅम्प लावायचा आहे आणि कोणत्या पदासाठी कोणत्या प्रवर्गात अर्ज केला आहे, त्याची माहिती ठळकपणे नमूद करायची आहे.

दिलेल्या पत्त्यावर १३ मार्च २०२१ पर्यंत तुमचा अर्ज पोहोचेल अशा पद्धतीने पाठवायचा आहे.

कशी होणार निवड?

आधी अर्जाच्या आधारे शॉर्टलिस्टिंग केली जाईल. नंतर लेखी परीक्षा होईल. यात यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना पदांच्या आवश्यकतेनुसार स्कील टेस्ट / फिजकल टेस्ट / प्रॅक्टिकल टेस्ट द्यावी लागेल.

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पहा

1 Comment
  1. Diksha Gaikwad says

    My dream is to join INDIAN AIRFORCE… To protect our Mother Land and my Indian family ❤️

Leave A Reply

Your email address will not be published.