तरुणांसाठी मोठी संधी ; कॅगमध्ये १०,८११ पदांची जंबो भरती; परीक्षा नाही, थेट नियुक्ती

0

नवी दिल्ली : जर तुम्ही सरकारी नोकरीच्य शोधात असाल आणि पात्र असाल तर तुमच्यासाठी मोठी संधी चालून आली आहे. भारताचे महालेखापाल म्हणून ज्या संस्थेची धास्ती साऱ्या राज्य सरकारांना असते त्या कॅगमध्ये (CAG Recruitment 2021) मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

कॅगमध्ये 10811 जागांसाठी जाहिरात निघाली आहे. यासाठी योग्य आणि इच्छुक उमेदवार ऑफलाईन अर्ज करू शकणार आहेत. यासाठी अधिकृत नोटीस cag.gov.in वर जाऊन पाहता येणार आहे. किंवा थेट लिंक खाली देण्यात आली आहे. अधिकृत नोटिफिकेशननुसार 6409 जागा लेखा परीक्षक आणि 4402 पदे लेखापाल म्हणून भरण्यात येणार आहेत. उमेदवार या पदांसाठी 19 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे.

अर्ज कसा कराल….

CAG Recruitment 2021 साठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोटिफिकेशन नीट वाचावे. यानंतर अर्ज डाऊनलोड करावा. काळजीपूर्वक अर्ज भरावा. यानंतर हा अर्ज स्पीड पोस्टाने “Shri V S Venkatanathan, Asstt. C &AG (N), O/o the C&AG of India, 9, Deen Dayal Upadhyay Marg, New Delhi- 110124.” या पत्त्य़ावर पाठवावा लागणार आहे.

शिक्षणाची अट : या पदांसाठी कोणत्य़ाी मान्यतप्राप्त बोर्ड,  विद्यापीठाची पदवी किंवा समकक्ष पदवी असणे बंधनकारक आहे.

वयाची अट… 18 ते 27 वर्षे ठेवण्यात आली आहे. याचबरोबर वेगवेगळ्या आरक्षणानुसार वयात सूट दिली जाणार आहे.

पगार : दोन्ही पदांसाठी पगार 29200-92300 हजार प्रतिमहिना असणार आहे. तसेच थेट नियुक्ती केली जाणार आहे. तुमच्या योग्यतेनुसार शॉर्टलिस्ट केले जाणार आहे.

नोटिफिकेशन पाहण्यासाठी :  इथे क्लिक करा…

 

Leave A Reply

Your email address will not be published.