केवलाई फाउंडेशन तर्फे रस्ते सुरक्षा जनजागृती पथनाट्याचे सादरीकरण

0

भडगाव  – प्रतिनिधी

भारत सरकारच्या परिवहन मंत्रालय व वाहतूक , शाखेच्या वतीने १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी पर्यंत रस्ते सुरक्षा जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. संपूर्ण  जिल्हात विविध  ठिकाणी विविध कार्यक्रमांद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.राष्ट्रीय राजमार्ग वाहतुक व परिवहन मंत्रालय, स्थानिक वाहतुक शाखा, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मा.डॉ.प्रविण मुंडे पोलिस अधिक्षक जळगाव, मा.शाम लोही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जळगाव, चंद्रकांत सिन्हा राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक, श्री.देविदास कुनगर पोलिस निरिक्षक शहर वहतुक शाखा जळगाव, श्री.गणेश पाटील मोटार वाहन निरीक्षक जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली ३२व्या रस्ता सुरक्षा अभियान २०२१ अंतर्गत केवलाई फाउंडेशन, पाचोरा या सामाजिक संस्थेच्या वतीने संपूर्ण जिल्हाभरात जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे.संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र असलेल्या केवलाई संस्थेतर्फे मागील ९ वर्षांपासून सामाजिक उपक्रम हाती घेण्यात येत आहे. सलग २ वर्षांपासून संस्थेच्या कार्याची दखल घेवून रस्ते व अपघात सुरक्षा जनजागृतीसाठी संस्थेची निवड करण्यात आली आहे. दि. २७ जानेवारी रोजी सदर कार्यक्रमाचे उद्घाटन भडगाव येथे संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार रमेश देवकर होते तर प्रमुख अतिथी म्हणून पोलिस निरीक्षक अशोक उत्तेकर, नवाळे साहेब, डॉ.भावना राठोड, डॉ.उमेश राठोड, हेमंत पाटील, नितीन वाणी ॲड भरत ठाकरे उपस्थित होते. प्रास्ताविक आबा पाटील यांनी, सूत्रसंचालन सुधाकर सोनावणे यांनी तर आभार केवलाई संस्थेच्या सचिव नीता पाटील यांनी मानले.नुकतेच संस्थेच्या वतीने  यावेळी नागरिकांना वाहतुकीचे नियम समजावून सांगून पत्रकाद्वारे जनजागृती करण्यात आली. तसेच प्रत्यक्ष प्रात्यक्षिक व पथनाट्य सादर करून रस्ते सुरक्षाविषयक जनजागृती करण्यात आली.यात सर्वसाधारण वाहन चालविताना सीट बेल्ट लावणे, दारू पिवून वाहन चालवू नये, हेल्मेट चा वापर काराने, अग्निश्यामक वाहन व रुग्णवाहिका यांना रस्ता मोकळा करून देणे अश्या विविध नियमांची माहिती पथ नाट्याद्वारे सादर करण्यात आली.या अभियानात केवलाई संस्थेचे अध्यक्ष आबा पाटील सर  युवाध्यक्ष धिरज देसले, प्रविण शिंदे, सी.जे.पाटील सर, विकास वाघ, करण वाडकर, चंद्रकांत इंगळे, नेहा पवार, पियुष तोडकर, हर्षा शर्मा, शांताराम निकम, रोहित देसले, मुकेश भाट, तुषार शिरुडे, पवन शिरुडे, सचिन देसले, पुरुशोत्तम पाटील, साहील पाटील, पंकज पाटील, शाम पाटील आदींचा सहभाग आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.