निपाणे येथे चर्मकार महासंघातर्फे पत्रकार लक्ष्मण पाटील यांचा सत्कार

0

निपाणे ता एरंडोल | प्रतिनिधी 

वृत्तपत्राचा प्रतिनिधी म्हणून काम करत असतांना लोकशाही चा चौथा आधार स्तंभ म्हणून पत्रकाराकडे पाहिले जाते गाव व परीसरात घडलेल्या चांगल्या वाईट घटनांचा वृतांत मांडत असतांना पत्रकारांना कटू प्रसंगांना देखील समोरे जावे लागते मात्र समाज मनाचा आरसा म्हणून देखील पत्रकारांकडे पाहिले जाते याचा अनुभव नुकताच मला पहावयास मिळाला एरंडोल तालुका पत्रकार संघाच्या उपाध्यक्ष पदी निपाणे येथील दैनिक देशदूत चे वार्ताहर लक्ष्मण बळीराम पाटील यांची तालुका स्तरावर निवड करण्यात आली त्यामुळे अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी पत्रकार लक्ष्मण पाटील यांच्यावर  शुभेच्छांचा वर्षाव करुन हार्दिक अभिनंदन केले चर्मकार महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष समाज भुषण पांडुरंग अण्णा बाविस्कर यांनी देखील सत्काराचे आयोजन करुन सपत्निक सत्कार करुन अभिनंदन केले यावेळी मी भारावून गेलो गितामध्ये सांगितल्या प्रमाणे ची जाणिव झाली केल्या शिवाय मिळत नाही आणि केलेले फुकट जात नाही आपण समाजाचं काही देणं लागतो असं समजून काम करत राहायच असा विश्वास बोलताना लक्ष्मण पाटील यांनी व्यक्त केला यावेळी समाज भुषण पांडुरंग अण्णा बाविस्कर यांनी देखील पत्रकार लक्ष्मण पाटील यांच्या विषयी गौरव पर उदगार काढून मनोबल वाढविले याप्रसंगी माजी ग्रा,प, सदस्य सागर पाटील माजी उपसरपंच महादू मन्साराम पाटील संजय महाजन चर्मकार महासंघाच्या जिल्हा कार्यकर्त्या सुनिता बाविस्कर वार्ताहर चंद्रभान पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.