सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डीझेल दरात वाढ ; जाणून घ्या नवा दर

0

मुंबई : जागतिक बाजारातील महागाईचे कारण पुढे करून पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरवाढीचा सपाटा लावला आहे. आज बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाली आहे.  आज पेट्रोल आणि डिझेलमध्ये सरासरी २५ पैसे वाढ झाली.

या दरवाढीने आज बुधवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९२.८६ रुपये आहे. एक लीटर डिझेलसाठी मुंबईतील ग्राहकांना ८३.३० रुपये मोजावे लागतील. प्रजासत्ताकदिनी मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ झाली होती. या दरवाढीने पेट्रोलियम कंपन्यांनी आपल्या तुंबड्या भरायला लावल्या असून केंद्र सरकार ढीम्म असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.

दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८६.३० रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ७६.४८ रुपये आहे. चेन्नईत देखील आज पेट्रोलचा भाव ८८.८२ रुपये असून डिझेल ८१.७१ रुपये आहे. कोलकात्यात एक लिटर पेट्रोलचा भाव ८७.६९ रुपये असून डिझेल ८०.०८ रुपये आहे. बंगळुरात आज एक लीटर पेट्रोलचा भाव ८९.२१ रुपये असून डिझेलचा भाव ८१.१० रुपये आहे.

जागतिक बाजारातील महागाईचे कारण पुढे करून पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरवाढीचा सपाटा लावला आहे. २०२१ च्या पहिल्या महिन्यात पेट्रोल आणि डिझेलमध्ये नऊ वेळा दरवाढ झाली आहे. यात पेट्रोल आणि डिझेल सरासरी २.२५ रुपयांनी महागले आहे. आज जागतिक बाजारात क्रूड आॅइलचा भाव ५२.५१ डाॅलर प्रती बॅरल आहे. तर ब्रेंट क्रूडचा भाव प्रती बॅरल ५५.५७ डाॅलर आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.