जिल्ह्यात आज २६ नवे बाधित आढळले ; तर ४२ कोरोनामुक्त

0

जळगाव प्रतिनिधी ।  जिल्‍ह्‍यातील कोरोना संसर्गाची लागण झालेल्‍या नवीन रूग्‍णांची संख्या घटली आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात 26 नवे कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहे. तर आज 42रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही.

आज प्राप्त कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात २६ नवीन बाधित आढळून आल्‍याने आतापर्यंत एकुण ५६ हजार ८७२ बाधित रूग्ण आढळून आलेत. त्यापैकी ४१६ रूग्ण ॲक्‍टीव्ह असून कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहेत. तर ५५ हजार १०५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. दरम्यान, आज एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही. आजपर्यंत मृत रुग्णांची एकूण संख्या १३५१ इतकी आहे.

आजच्या आकडेवारीनुसार

जळगाव शहर-६, जळगाव ग्रामीण-०, भुसावळ-३, अमळनेर-०३, चोपडा-०, पाचोरा-०, भडगाव-०१, धरणगाव-०, यावल-०२, एरंडोल-००, जामनेर-०, रावेर-२, पारोळा-२, चाळीसगाव-०१, मुक्ताईनगर-६, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील ०० असे एकुण २६ रूग्ण आढळून आले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.