पाचोरा येथील पदमसिंग पाटील यांची केंद्र शासनाच्या रासायनिक व खते विभाग संचालक पदी नियुक्ती

0

पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा येथील रहिवासी व दिल्ली येथे केंद्र शासनाच्या आय. पी. ए. एस. अधिकारी पदावर कार्यरत असलेले पदमसिंग प्रदिपसिंग पाटील यांची केंद्र शासनाच्या केंद्रीय रासायनिक व खते मंत्रालयात संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पदमसिंग पाटील हे सन – २०१० च्या यु. पी. एस. सी. परिक्षेत उत्तीर्ण होवुन त्यांची आय. पी. ए. एस. अधिकारी पदी निवड झाली होती. पदमसिंग पाटील यांनी केंद्र शासनाच्या प्रत्यक्ष कर विभागात उपनिबंधक, औद्योगिक मंत्रालय विभागात उपनिबंधक, गृहनिर्माण व महानगर विभागात उपनिबंधक तसेच लोक वित्तीय नियोजन प्रणालीत महाराष्ट्र, गोवा, गुजरात, केरळ या राज्यांचे नोडल अधिकारी, अर्थ मंत्रालयात सहाय्यक लेखा नियंत्रक म्हणुन कार्य केले आहे.

देशाच्या रासायनिक व खते मंत्रालयात संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पदमसिंग पाटील हे पाचोरा शहरातील कालिकानगर येथील निवासी प्रदिपसिंग पाटील यांचे ज्येष्ठ सुपुत्र आहेत. त्यांच्या यशाचे श्रेय ते आई, वडील, कुटुंबिय, मार्गदर्शक शिक्षक तसेच त्यांचे मित्र मनोज चोथे (आय. पी. एस.), वैभव घालगे (आय. ए. एस.), अमित गुरव (आय. आर. एस.), रामचंद्र शिंगारे (आय. पी. एस.), यांना देतात. पदमसिंग पाटील यांचे शिक्षण पाचोरा शहरातील गो. से. हायस्कूल, शेठ मुरलीधर मानसिंगका महाविद्यालय व राहुरी कृषी विद्यापीठात झाले आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.