अमळनेर शहरात १०५ फुटावर फडकणार तिरंगा

0

अमळनेर : शहरात नगरपरिषदेतर्फे पन्नालाल चौकात 105 फूट  तिरंगा 24 तास फडकणार असून खांब उभारण्यात आला आहे. त्यामुळे शहराच्या सौंदर्यात व वैशिष्ट्यात भर पडून तिरंगा आकर्षण ठरणार आहे.

शहरातील रस्ते व धुळे चोपडा राज्य मार्ग जोडणाऱ्या पन्नालाल चौकाचे सुशोभीकरण सुरू झाले असून शहराची आगळी वेगळी ओळख निर्माण व्हावी आणि काही किमी अंतरावरून विशिष्ठ ओळख दिसावी म्हणून माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार  नगरध्यक्षा पुष्पलता पाटील , मुख्याधिकारी डॉ विद्या गायकवाड व नगरसेवकांच्या सहकार्याने या चौकात 105 फूट खांब उभारण्यात आला आहे. यावर कायमस्वरूपी भारताचा तिरंगा फडकणार आहे. लखलखाट प्रकाशाचे दिवे लावण्यात येणार असल्याने दिवस रात्र तिरंगा स्वाभिमानाने डोलाने फडकणार आहे. प्रताप तत्वज्ञान केंद्र ,संत सखाराम महाराज संस्थान , मंगळग्रह मंदिर,अंबर्षी टेकडी ,सती माता मंदिर आदींसह 105 फूट तिरंगा मुळे अमलनेरच्या वैशिष्ट्यात भर पडणार आहे. यामुळे नागरिकांमध्ये देशभक्ती जागृत होईल.

१०५ फूट खांब उभारण्यात आला असून शक्य झाल्यास 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी  ध्वजारोहण होईल अन्यथा आठ दिवसात संपूर्ण चौक सुशोभीकरण होऊन कायमस्वरूपी तिरंगा लावण्यात येणार आहे– साहेबराव पाटील , माजी आमदार , अमळनेर

Leave A Reply

Your email address will not be published.