अखेर सत्याग्रह ने केला निम्न ज्ञानगंगाच्या पाण्याचा मार्ग मोकळा

0

खामगाव (प्रतिनिधी) : गेल्या अनेक दिवसांपासून चिघळत चाललेला निम्न ज्ञानगंगा च्या पाण्याचा प्रश्न अखेर सत्याग्रह शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने सुटला असून शेकडो शेतकऱ्यांचा हजारो एक्कर शेतीला पाणी मिळाले आहे. आज संघटनेचे राष्ट्रीय संयोजक कैलास फाटे यांच्या हस्ते तांदुळवाडी धरणावरून पाटाने सोडल्या जाणाऱ्या पाण्याचे उद्घाटन करून शेकडो शेतकऱ्यांना आपले शेतातील पिक वाचविण्यासाठी नवसंजीवनी मिळवून दिली.

निम्न ज्ञानगंगा धरणामुळे हजारो हेक्टर शेती सिंचनाखाली येत असून अधिकाऱ्यांच्या कामचुकार पणामुळे बुळीत व लाभक्षेत्रातील शेती असलेल्या शेतकऱ्यांच्या मोबदल्यात व सुविधेत खूप अडथळे निर्माण झाले आहेत त्यापैकी निमकवळा येथील महेंद्रसिंग राठोड, सुरेंद्रसिंग राठोड, रवींद्रसिंग राठोड यांना बुळीत क्षेत्राचा व फळझाडांचा मोबदला न दिल्यामुळे त्यांनी पाणी सोडण्यास अडथळा निर्माण केला होता. एकिकडे शेतकऱ्यांना मोबदला मिळत नाही आणि दुसरीकडे शेकडो शेतकऱ्यांचे रब्बीचे पिक पाण्याविना सुकत आहे. ह्या दोन्ही गोष्टींचा प्रश्न दोघांना न्याय देत मध्यस्थी करून कैलास फाटे यांनी सोडवला. बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांना त्यांचा शेतीचा व फळझाडांचा मोबदला द्या व लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी व शेतरस्त्यांचा प्रश्नकायमस्वरूपी सोडवून द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करणार असा इशाराही फाटे यांनी दिला.

यावेळी जिल्हा संयोजक राजू नाकडे, संतोष सातपुते, संजय बोचरे, आकाश देशमुख, अजय बाठे, ग्रामपंचायत सदस्य रेखा दाभाडे, रत्नमाला जाधव, विजय लाहुडकर, रामेश्वर लाहुडकर, दत्तात्रय लाहुडकर, मिलिंद दाभाडे, शिवाजी लाहुडकर, शत्रुघ्न भांबेरे, संदीप लाहुडकर, निंबाजी लाहुडकर, राहुल घनमोडे, मोहन तेलंग, राहुल तेलंग , कैलास देशमुख , केशव देशमुख, सिद्धार्थ धुरंधर, श्रावण चव्हाण, अशोक चव्हाण, अनिल देशमुख, विशाल दगड़खैरे, शिवाजी नखाडे, विठ्ठल सोळंके, शेषराव कुऱ्हाडे, शामराव डोंगरदिवे, जानराव देशमुख, सुनील राऊत, संतोष राऊत, गजानन इंगळे, विष्णू देवके, संदीप देशमुख, सुनील देशमुख, अशोक यादगिरे, प्रकाश तायडे, अशोक तायडे, महादेव गाडगे, मिलिंद शिरसाट, श्री बोंबटकर, विजय झांबरे, मनोज बोडवडे, हरिभाऊ पवार, सुमित दाभाडे, शिवाजी काळंगे, राहुल वसतकार, नारायण काळे सह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.