खडसेंविरोधातील गुन्हा रद्द होणार का? आज उच्च न्यायालयात सुनावणी

0

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्याविरोधात ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द व्हावा म्हणून खडसे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दरम्यान, त्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. तसेच ईडीही आज खडसेंविरोधात अतिरिक्त प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर करणार आहे. त्यामुळे खडसेंविरोधातील गुन्हा रद्द होणार का? याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

ईडीने एकनाथ खडसे यांची सुमारे साडेसहा तास कसून चौकशी केली होती. त्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा रद्द व्हावा म्हणून खडसे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर गुरुवारी कोर्टात सुनावणी झाली. कोर्टात खडसे यांच्या वकिलांनी गुन्हा रद्द करण्याची जोरदार मागणी केली. तर ईडीच्या वकिलांनी त्याला विरोध केला.

आमच्याकडे खडसेंविरोधात अनेक पुरावे आहेत. अनेक साक्षीदार आहेत. याबाबत आम्हाला कोर्टात अतिरिक्त प्रतिज्ञापत्रं सादर करायचं आहे. त्यामुळे खडसेंवरील गुन्हा रद्द करू नये, असं ईडीने म्हटलं होतं. त्यावर कोर्टाने ईडीला अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. ईडी आज हे प्रतिज्ञापत्रं कोर्टात सादर करणार असून त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.