दिलासा : जिल्‍ह्‍यात आज केवळ २२ जणांना कोरोनाची बाधा

0

जळगाव प्रतिनिधी ।  जिल्‍ह्‍यातील कोरोना संसर्गाची लागण झालेल्‍या नवीन रूग्‍णांची संख्या घटली आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात २२ नवे कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहे. तर आज ४४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही. दरम्यान, आज सहा तालुक्यातील आकडेवारी निरंक असल्याचे दिसून आले आहे.

 

आज प्राप्त कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात २२ नवीन बाधित आढळून आल्‍याने आतापर्यंत एकुण ५६ हजार ८१३ बाधित रूग्ण आढळून आलेत. त्यापैकी ४५१ रूग्ण ॲक्‍टीव्ह असून कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहेत. तर ५५ हजार ११ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. दरम्यान, आज एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही. आजपर्यंत मृत रुग्णांची एकूण संख्या १३५१ इतकी आहे.

 

आजच्या आकडेवारीनुसार

जळगाव शहर-५, जळगाव ग्रामीण-०, भुसावळ-२, अमळनेर-०, चोपडा-४, पाचोरा-२, भडगाव-०, धरणगाव-२, यावल-१, एरंडोल-३, जामनेर-०, रावेर-१, पारोळा-०, चाळीसगाव-२, मुक्ताईनगर-०, बोदवड-० असे एकुण २२ रूग्ण आढळून आले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.