महाराष्ट्र ग्रंथालय सेनेतर्फे सामना वाचन प्रेरणा दिवस साजरा

0

धरणगाव : येथील सानेपटांगणावर महाराष्ट्र ग्रंथालय सेनेतर्फे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त सामना वाचन प्रेरणा दिवस,5 वी ते 10 वी विद्यार्थ्यांसाठी मोफत क्लासेस,व चित्रकला स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री मा.ना.गुलाबरावजी पाटील हे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ,महाराष्ट्र ग्रंथालय सेनेचे प्रदेश उपप्रमुख पी एम पाटील सर,चर्मकार समाजाचे  नेते भानुदास अप्पा विसावे,नगराध्यक्ष निलेश चौधरी, जि प सदस्य गोपाल चौधरी, प.स.सभापती मुकुंद नन्नवरे, उपनगराध्यक्षा सौ कल्पना विलास महाजन,मा.नगराध्यक्षा सौ उषाताई वाघ,सौ अंजलीताई विसावे,गटनेते पप्पू भावे,धानोरा सरपंच भगवान महाजन,सभापती शिक्षण वासुदेव चौधरी,शहर प्रमुख राजेंद्र महाजन,अक्षय महाजन,सौ प्रतिभा पाटील,संजय पाटील,ग्रंथालय सेना प्रसिद्धी प्रमुख योगेश पी पाटील,जिल्हा ग्रंथालय सेना प्रमुख प्रशांत पाटील उपस्थित होते.

विनोद रोकडे यांच्या वाढदिवस व नवानिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी गुलाबराव पाटील यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले बाळासाहेबांच्या आशीर्वादाने मी पाच वेळा आमदार व दोन वेळा मंत्री,पालकमंत्री झालो. धरणगाव व जळगाव तालुक्यात ग्रामपंचायतीत घवघवीतव यश मिळाले.

या प्रसंगी गुलाबराव वाघ,भानुदासअप्पा विसावे,गोपाल चौधरी,भगवान महाजन यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन पी एम पाटील सर यांनी केले तर आभार डॉ प्रशांत पाटील यांनी मानले.

जळगाव जिल्ह्यातील ग्रंथालय सेनेचे पदाधिकारी,सर्व नगरसेवक,शिवसैनिक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.