येत्या २६ जानेवारी रोजी “दावते इस्लामी हिंद” करणार मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण

0

भुसावळ (प्रतिनिधी)- वेगाने बदलणारे वातावरण आणि जगभरातील बिघडत चाललेल्या हवामानाचा विचार करत “दावत-ए-इस्लामी हिंद” तर्फे 20 जुलै. सन २०२० पासून संपूर्ण भारतभर वृक्षारोपण मोहीम राबविली जात आहे, या मोहिमेच्या माध्यमातून एक कोटी २० लाख झाडे लावण्याचा संकल्प आहे, परंतु कोरोनामुळे या मोहिमेस अडथळा निर्माण झाला होता, म्हणून येत्या २६ जानेवारी २०२१ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  या संदर्भात, 20 जानेवारी 2021 रोजी, दावते इस्लामी हिंदचे  राष्ट्रीय सदस्य आणि वृक्षारोपण विभागाचे प्रमुख हाजी सलीम यांनी एक ऑनलाइन बैठक घेतली ज्यामध्ये 26 जानेवारीपूर्वी आपल्या प्रिय मातृभूमीला ग्रीन भारत बनविण्यासाठी सर्व प्रयत्न  करू यात  इलेक्ट्रॉनिक, प्रिंट किंवा सोशल मीडियाद्वारे  सामान्य लोकांना वृक्षारोपण करण्याचे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केला जाईल.  जेणेकरून अधिकाधिक लोक या वृक्षारोपण मोहिमेत सहभागी होऊ शकते असा निर्णय घेण्यात आला हाजी सलीम पुढे म्हणाले की  ही काळाची महत्वाची व ग्रीन इंडियाच्या निर्मितीची गरज आहे अशी माहिती रफिक रोशन कादरी

मीडिया विभाग

दावतेईसलामी हिंद यांनी दिली .

Leave A Reply

Your email address will not be published.