पाचोरा येथे बॅंक ऑफ बडोदा शाखेत अज्ञात चोरट्यांचा चोरी करण्याचा प्रयत्न फसला

0

पाचोरा (प्रतिनिधी) :  शहरातील भडगाव रोडवर  निर्मल सिड्स या कंपनी समोर असलेल्या बॅंक ऑफ बडोदा मध्ये रात्रीच्या वेळेस बॅंकेची खिडकी तोडून २ ते २:३० वाजे दरम्यान अज्ञात चोरट्यांनी जिन्याखालील खिडकी उखडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून बॅंकेतील विद्यूत सप्लाय बंद करून सी. सी. टी. व्ही. कॅमेरे, व्ही. सी.आर. यांच्या केबल तोडून नुकसान केले. चोरटे लॉकर पर्यंत पोहचू शकले नाहीत आत मध्ये फिरत होते सदरील प्रकार सकाळी ९ वाजता बँकेत कर्मचारी आल्यावर समोर आला.

बॅंकेतुन कुठल्या प्रकारची रोकड चोरी गेलेली नाही
सुमारे २० हजार रूपये च्या वायर व खिडकीचे नुकसान झाले आहे घटनास्थळी पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांनी भेट देऊन पाहणी केली.

घडलेल्या घटनेची माहिती बॅक मॅनेजर विक्रात अशोक शर्मा  यांनी पाचोरा पोलीसात दिली असता पाचोरा पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील सह श्र्वान पथक, फिंगरप्रिंट एक्स्पर्ट यांनी घटनास्थळी धाव घेतली व पाहणी करूण सदर घटनेचा पंचनामा केला पुढील तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल अजय मालचे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.