निपाणे ग्रा.पं.वर फडकला शिवसेनेचा भगवा

0

निपाणे ता एरंडोल ( वार्ताहर) : निपाणे येथे ग्राम पंचायती ची निवडणूक दोन पॅनमध्ये तीन वार्डात मोठ्या चुरशीची झाली श्री संत हरीहर महाराज परीवर्तन पॅनलने ९ पैकी ८ जागा जिंकून ग्राम पंचायती वर दणदणीत विजय मिळवला कै, नारायण साहेब प्रणीत आदर्श ग्राम विकास पॅनलला यावेळी फक्त एक जागेवर समाधान मानावे लागले आहे
वार्ड क्रं १ मध्ये सौ, सुनिता हिंमत पाटील (ओबीसी महिला )विजय भास्कर सोनवणे (एससी पुरुष) निवडून आले आहेत तर सौ,निलिमा समाधान ठाकूर (एसटी महिला) यापूर्वी बिनविरोध निवडून आल्या आहेत.

वार्ड क्रं २ मध्ये सौ, संगिता भिका पाटील (ओबीसी महिला) सौ, सुरेखा राजेंद्र पाटील ( जनरल महिला) बाळू सुभाष महाजन (ओबीसी पुरुष) निवडून आले आहेत वार्ड क्रं ३ मध्ये सौ, शालिनी शरद ठाकूर ( जनरल महिला) सुरेश लक्ष्मण भिल (एसटी पुरुष) तर आदर्श ग्राम विकास पॅनलच्या श्रीमती सरुबाई प्रकाश भिल निवडून आल्या आहेत गेल्या पाच पंचवार्षिक पासून एकहाती सत्ता मिळवणार्या माजी जि प, सदस्य प्रा, संजय नारायण पाटील यांच्या ग्राम विकास पॅनलला फक्त एक जागेवर समाधान मानावे लागले आहे श्री संत हरीहर महाराज परीवर्तन पॅनलमध्ये प्रचार कामी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजूआबा माजी सरपंच श्रीधर पाटील व माजी ग्रा,प, सदस्य शरद ठाकूर यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडून श्री संत हरीहर महाराज परीवर्तन पॅनलचा दणदणीत विजय खेचून आणला आहे परीवर्तन पॅनलचे सर्व विजयी उमेदवारांचे आ, चिमणराव पाटील शिवसेनेचे तालुकाप्रमुख वासुदेव पाटील उपप्रमुख संजय पाटील जि, प, चे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले सभापती अनिल पाटील जिल्हा दुध संघाचे संचालक अशोक दादा पंचायत समिती सदस्य दिलीप महाजन अदिंनी अभिनंदन केले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.