जळगावात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत लसीकरण मोहिमेला सुरुवात

0

जळगाव | आजपासून देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे देशभरात आनंदाचे वातावरण आहे. जळगावात कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे.

जळगावात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक डाॅ. प्रवीण मुंढे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.  जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ एन. एस. चव्हाण,  जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. भीमाशंकर जमादार यांचेसह आरोग्य यंत्रणेचे डाॅक्टर, कर्मचारी उपस्थित होते.

जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचे पहिले लाभार्थी ठरले अधिष्ठाता डाॅ. रामानंद, त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण व जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ जमादार यांना लस देण्यात आली.

दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने संयुक्तरित्या निर्माण केलेली ‘कोव्हिशील्ड’ आणि भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लस पहिल्या टप्प्यात कोरोनायोद्ध्यांना दिल्या जाणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेशी संवाद साधत आहेत.करोना वॅक्सिनचे दोन डोस घेणं अत्यंत आवश्यक असल्याचे, यावेळी त्यांनी आवर्जुन सांगितले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.