चाळीसगाव नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचा दुजाभाव ; प्रतिष्ठातांचे अतिक्रमण सुरक्षित, तर गरिबांच्या अतिक्रमणावर हातोडा

0

चाळीसगाव:-(प्रतिनिधी )

चाळीसगाव शहरातील प्रभाग क्रमांक 14 मधील छोटी दुसरी गल्ली ते कुरेशी गल्लीत  दोघी बाजूने तेथील रहिवाशांनी केलेल्या अतिक्रमणाबाबत अनेक दिवसांपासून चाळीसगाव नगरपालिकेकडे तक्रारी दाखल केल्या होत्या .

त्या अनुषंगाने चाळीसगाव नगरपालिका अतिक्रमण विभागाने नुकतीच प्रभाग क्रमांक 14 मधील छोटी गुजरी कुरेशी गल्ली पर्यंतचे अतिक्रमण काढले परंतु हे अतिक्रमण काढत असताना अतिक्रमण विभागाने प्रतिष्ठितांना व नगरसेवक असलेल्या आणि त्यांनी अतिक्रमण केलेल्या लोकांना अभय दिले  आणि त्याच गल्लीत गोरगरीब जनतेच्या अतिक्रमणावर हातोडा फिरवला .

यामुळे परिसरातील जनतेने पुन्हा माननीय जिल्हाधिकारी साहेब जळगाव व चाळीसगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी साहेब यांना निवेदन दिले कि अतिक्रमण काढत असताना गरिबाच्या घरावरील अतिक्रमणावर जेसीपी फिरवले आणि याच गल्लीतील जे प्रतिष्ठित नागरिक आहेत आणि स्वतः नगरसेवक यांचेही घराजवळ मोठे अतिक्रमण झाले आहे हे मात्र नगरपालिकेने काढले नसल्यामुळे  परिसरातील जनतेमध्ये संतापाची लाट पसरली आहे त्यामुळे नगरपालीकेला  अतिक्रमण जर काढायचे होतेच तर कुणाला अंगाशी आणि कुणाला पायाशी ठेवणे उचित आहे का ? असा सवाल स्थानिक रहिवाशांनी विचारला आहे तरी उर्वरित अतिक्रमण नगरपालिकेने त्वरित काढावे यासाठी स्थानिक रहिवासी शेख अयुब शेख फकीरा ,उस्मान खाँ ,नावेद मिर्जा, फारुख खान  एस के महमंद,समीर खान,शेख कय्यूम शेख कल्ले,अशा जवळपास पंचवीस ते तीस नागरिकांनी सह्या केल्या आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.