अग्रवाल हॉस्पिटल येथे 21 डिसेंबर रोजी मोफत अस्थिरोग शिबीर व हाडाच्या ठिसूळपणाची तपासणी

0

खामगाव ;- खामगाव येथिल सुप्रसिद्ध अस्थिरोग विशेषज्ञ डॉ. नितीश जगदीश अग्रवाल यांच्या अग्रवाल हॉस्पिटल, नांदुरा रोड येथे सोमवार दि. 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 3 पर्यंत मोफत अस्थिरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामधे बी. एम. डी. टेस्ट म्हण्जेच हाडातील ठिसूड़पणाची तपासणी मशीनी द्वारे करून त्या सम्बन्धी उपचार व मार्गदर्शन देण्यात येणार आहे. या मधे गुडघ्याचे दुखणे, मान दुखी, कम्बर दुखी, खांद्यांचे आजार, मणक्यांचे आजार, सन्धीवात इत्यादी आजारांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. तरी
संबंधीत रुग्णांनी अग्रवाल हॉस्पिटलच्या मो. नं. 8605779989, 7218998933 वर नाव नोंदणी करून या सुवर्ण सेवेचा लाभ घ्यावा तसेच कोरोना नियमांचे पालन करावे असे आवाहन अग्रवाल हॉस्पिटल खामगाव च्या वतिने करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.