खतरनाक….! तब्बल १२५ फुटी आणि साडे सहा हजार कार्यकर्त्यांचे फोटो असलेला ‘बॅनर’

0

पुणे : हौशी कार्यकर्ते आपण नेहमीच पाहतो. अशाच काही हौशी कार्यकर्त्यांनी केलेल्या पोस्टर बाजीची सर्वत्र चर्चा सुरु आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात करण्यात आलेल्या भन्नाट बॅनरबाजी सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य देवराम लांडे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर दोन हजार फोटोंचा शुभेच्छा बॅनर लावला होता. त्यांचा मुलगा, जुन्नर तालुक्‍यातील केवाडीचे सरपंच अमोल लांडे यांनी नुकताच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करत संघटनेतील राज्य पातळीवरील पद पदरात पाडून घेतले.

त्यानंतर लगेचच त्याचा राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने तब्बल १२५ फूट आकाराचा भव्यदिव्य बॅनर झळकवला आहे. तसेच यापुढील आश्चर्य म्हणजे त्यावर ६ हजार ५०० समर्थकांचे फोटो छापले आहे.त्यामुळे हा बॅनर परिसरात चर्चेचा विषय ठरतो आहे. स्थानिक पातळीवरील पब्लिसिटी स्टंट असल्याचे पण बोलले जात आहे. तसेच बॅनरवर राजकीय वजन दाखवण्यापेक्षा सामाजिक कार्यातून आपला ठसा उमटायला हवा असे मत देखील काही नागरिक व्यक्त करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.