VIDEO: चहलच्या होणाऱ्या पत्नीचा ‘हा’ भन्नाट डान्स पाहिलात का?

0

नवी दिल्ली : भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल IPL संपवल्यानंतर तो यू-ट्युबर धनश्री वर्मासोबत कधी लग्नाच्या बेडीत अडकणार याची सर्वत्र चर्चा रंगल्याचे दिसत आहे. धनश्री दुबईला IPLच्या सामन्यांना हजेरी लावताना दिसली. पण IPL संपल्यानंतर युजवेंद्र चहल ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाला आणि धनश्री पुन्हा भारतात परतली. सध्या धनश्री एका नव्या कोऱ्या गाण्यावरील डान्समुळे प्रचंड चर्चेत आहे.

 

धनश्रीने आपल्या इन्स्टाग्रांम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात ती एका स्टु़डिओमध्ये डान्स करताना दिसते आहे. बॉलिवूडची क्यूट अभिनेत्री कियारा अडवाणी हिचा इंदू की जवानी हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटातील ‘हिलें टूट गयीं’ नावाचं एक गाणं सध्या चांगलंच गाजतंय. या नव्या कोऱ्या गाण्यावर कियाराने पाश्चात्य प्रकारचा सुंदर डान्स केला आहे. याच गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ धनश्रीनेदेखील पोस्ट केला आहे. या व्हिडीओला १० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळालेले आहेत. सध्या धनश्रीचा हा डान्स चांगलाच चर्चेचा विषय ठरताना दिसतो आहे.

View this post on Instagram

A post shared by Dhanashree Verma (@dhanashree9)


 

दरम्यान, धनश्री वर्मा ही भारतातल्या प्रसिद्ध यू-ट्युबर पैकी एक मानली जाते. तिच्या यू-ट्युब चॅनलचे २ मिलियन फॉलोअर्स आहेत. अनेकांना चहल आणि धनश्री वर्माच्या या बातमीने आश्चर्याचा धक्का बसला होता. लॉकडाउन काळात चहल घरात बसून आपल्या परिवारासोबत वेळ घालवत होता. अनलॉक काळात चहलने सरावासाठी सुरुवात केली होती पण टीक-टॉकच्या व्हिडीओमुळे तो अधिक चर्चेत असायचा. असं असताना अचानक एक दिवस त्याने धनश्रीशी साखरपुडा केल्याची बातमी दिली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.