Video : सगळं बरं आहे का? ; जेव्हा हार्दीक पंड्या चक्क मराठीत बोलतो….

0

मुंबई | महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी बोलता आलंच पाहिजे हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुद्दा भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने देखील उचललेला दिसतोय. मुळचा गुजराती असलेला पांड्या मराठीही तितकंच छान बोलतो. युएईत सराव करत असताना हार्दिक पांड्याचा सूर्यकुमार यादवसोबत मराठीतून बोलतानाचा एक व्हिडीओ मुंबई इंडियन्सने आपल्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केला आहे.

त्यात हार्दिक चक्क मराठीत बोलताना दिसत आहे. हार्दीक पांड्यानंही मुंबईत राहणाऱ्यांना मराठीतच बोललं पाहिजे असं सांगितलंय. मी मराठी शिकलो असून मुंबईत राहणाऱ्यांनीही मराठीत आपल्या गोष्टी केल्या पाहिजेत, असे हार्दीकने म्हटले आहे.

मुळचा गुजराती असलेला पांड्या मराठीही तितकंच छान बोलतो. युएईत सराव करत असताना हार्दिक पांड्याचा सूर्यकुमार यादवसोबत मराठीतून बोलतानाचा एक व्हिडीओ मुंबई इंडियन्सने आपल्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केला आहे.


मुंबई इंडियन्सने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन कसं काय, हार्दीक भाऊ? अशी टॅगलाईन देत हार्दीक पांड्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत हार्दीक चक्क मराठीत बोलताना दिसून येत आहे. काय म्हणताय, सगळं बरं का? नाय नाय आमची मुंबई खूप खूप छान, ये कसा काय पुछतो .. तू सांग कसा काय ते… सगळ बरं आहे, इथं धूप खूप हाय. गर्मी तर अहा..असे हार्दिक म्हणाला.

 

काय सांगू तुम्हाला. मी मराठी शिकणार आता, बॉम्बेमध्ये कोई भी मिलना तो मराठीत गोष्टी करा आता, सगळं येतं मला. करतो पण आता आणि प्रॅक्टीसपण इथंच चाललीय, असे संवाद हार्दीकने मराठीत म्हटले आहेत. हार्दीकचा हा व्हिडिओ नेटीझन्सला चांगलाच आवडला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.