शेतकरी हितासाठी वाढदिवसानिमित्तचे कार्यक्रम रद्द

0

भुसावळ (प्रतिनिधी)- युवा हृदय सम्राट अनिल छबीलदास चौधरी यांचा मंगळवार, 8 डिसेंबर रोजी वाढदिवस असला तरी शेतकरी हित डोळ्यापुढे ठेवून चौधरी यांनी सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले असल्याचे कळवले आहे. मंगळवारी भारत बंदची हाक देण्यात आली असून या बंदला आपला पाठिंबा असल्याचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी कळवले आहे.

चौधरी म्हणाले, शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून शेतकरी हित जोपासण्यासाठी आपण आपल्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी आयोजित सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. कार्यकर्ते व हितचिंतक व चाहत्यांनी याची नोंद घेवून कुठलेही कार्यक्रम घेवू नये तसेच शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवावा, असेही त्यांनी कळवले आहे. दरम्यान, तापी नगरातील बंगल्यावर मंगळवारी दुपारी चार ते नऊ दरम्यान अनिल चौधरी हे हितचिंतकांच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.