आईची सावली बालभवन”अनाथ आश्रमाला”जनजागृती सेवा समितीच्यावतीने”मास्क, सॅनिटायझर,हॅन्ड वाॅश व खाऊ वाटप

0

टीटवाळा– कोरोना संसर्गामुळे सर्वच त्रस्त आहेत. कोविड19नुसार मास्क, सॅनिटायझर, हॅन्ड वाॅश ही त्रिसुत्री सर्वानांच अनिवार्य आहे. त्याच अनुषंगाने टीटवाळा येथील आईची सावली बालभवन अनाथ आश्रमातील मुलांना जनजागृती सेवा समितीच्यावतीने मास्क, सॅनिटायझर, हॅन्ड वाॅश व खाऊ वाटप नुकताच करण्यात आले. याप्रसंगी अखिल भारत हिंदु महासभा, महाराष्ट्र प्रदेश प्रभारी अॅड.रणधिर सकपाळ,स्वराज्य रणरागिणी मंडळ सदस्या व श्रावणी बेबी सेटींगच्या संचालिका सौ.सुप्रिया आचरेकर,प्रथमेश कडव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.त्यांच्याच हस्ते मुलांना मास्क, सॅनिटायझर, हॅन्ड वाॅश व खाऊ वाटप करण्यात आले.

याप्रसंगी सीमा गुरुंग, हेमलता कोरडे, राधा गुप्ता या कार्यकर्त्या उपस्थित होत्या. या उपक्रमासाठी कार्यकारिणी सदस्या सौ.श्रुती उरणकर, राहुल अॅकॅडमी ऑफ डायनॅमिक अॅक्टीव्हीटीजचे संचालक व विद्यार्थी मित्र दिपक राणे, कार्यकारिणी सदस्य महेश्वर तेटांबे, समाजसेविका सिंधुताई वायचळ काकु,अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांचे विशेष सहकार्य लाभले.कार्यक्रम प्रसंगी उपस्थितांचे राईटस ऑफ वुमेन फाऊंडेशनच्या संचालिका दिपा गांगुर्डे यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. व शेवटी सर्वांचे आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.