दोन अट्टल मोटारसायकल चोरांना अटक : सात मोटारसायकल चोरीची दिली कबुली

0

धुळे येथे विक्री करताना भडगाव पोलिसांनी रंगेहाथ पकडले होते

भडगाव (प्रतिनिधी) : शहरातील पाटील वाडा येथून घरासमोर लॉक केलेली बजाज प्लाटिना ही मोटारसायकल चोरी झाली होती या बाबत पोलिस स्टेशनला अज्ञात विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या बाबत भडगाव पोलिसांनी तपास चक्रे जलद फिरवत भडगाव येथील दोघा मोटारसायकल चोरांना धुळे येथे रंगेहाथ विक्री करताना पकडले दोघांना अटक करण्यात आली आहे. भडगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. या मध्ये तपास करत असताना सात मोटारसायकल चोरी केल्याची कबुली आरोपींनी दिली असल्याची माहिती भडगाव पोलिसांनी दिली

या बाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी – संतोष शिवराम धनगर रा. पाटील वाडा भडगाव याच्या घरासमोर बजाज प्याटीना लावली असताना चोरी गेली. व या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला.

या बाबत भडगाव पोलिसांनी तपास चक्रे जलद फिरवली व गुप्त बातमीदार तर्फे माहिती घेतली असता धुळे येथे विक्री साठी गेले असल्याची माहिती मिळताच भडगाव पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक – अशोक उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक – आनंद पटारे, सुशील सोनवणे, पोलिस नाईक- प्रल्हाद शिंदे, पोलिस हेड कॉन्स्टेबल किरण ब्राम्हने, पोलिस नाईक लक्ष्मण पाटील, ईश्र्वर पाटील , नितीन रावते स्वप्निल चव्हाण यांच्या पथकाने धुळे पोलिस स्टेशन येथून दोन पोलिसांना सोबत घेत फागणे येथे विक्री करत असताना आरोपी – अजय दिगंबर जाधव रा. खालची पेठ, व पप्पू ऊर्फ गणेश आनंदा माळी रा. जकातदार गल्ली भडगाव हे मोटारसायकल सह आढळून अाले. त्यांना विचारपूस केली असता उडवाउडव उत्तर देत दोघांना ताब्यात घेऊन भडगाव पोलिस स्टेशन ला अटक करण्यात आली.

 

या बाबत आरोपी – अजय दिगंबर जाधव रा. खालची पेठ भडगाव, व पप्पू ऊर्फ गणेश आनंदा माळी रा. जकातदार गल्ली भडगाव यांच्या विरूद्ध भाग ५ गु.र. न.३०६/२०२० कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या बाबत दोघी आरोपींची भडगाव पोलिसांनी कसून चौकशी केली असता सात मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे. यामध्ये सहा बजाज प्ल्याटिना, व एक बजाज डिस्कवर ह्या मोटारसायकल मिळून आल्या आहे.

 

आरोपी-अजय दिगंबर जाधव रा. खालची पेठ भडगाव, व पप्पू ऊर्फ गणेश आनंदा माळी रा. जकातदार गल्ली भडगाव या दोघी आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालइन कोठडी सुनावली. परंतु अजुन दुसऱ्या गुन्ह्यात आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती भडगाव पोलिस निरीक्षक अशोक उतेकर यांनी दिली. या बाबत मोटारसायकल चोरीचे मोठे रॅकेट व इतर गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.