पाचोरा येथे महात्मा जोतीराव फुले स्मृती दिन साजरा

0

पाचोरा  (प्रतिनिधी) : येथे क्रांतिसुर्य महात्मा जोतीराव फुले यांचा दि. २८ नोव्हंबर स्मृती दिवस साजरा करण्यात आला. यावेळी पिंपळगाव ता. चाळीसगाव येथील शहीद झालेले वीर जवान यश देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. व पाचोरा शहरात लवकरच नियोजित जागी महात्मा फुले स्मारक उभारावे ही एकमुखी मागणी करण्यात आली.

याबाबत नगरपालिकेने जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी ही विठ्ठल महाजन यांनी यावेळी बोलुन दाखवली. सामाजिक कार्यकर्ते दिपक भावराव शेवरे, पाचोरा यांच्या राजे संभाजी नगर येथील निवासस्थानी, क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव गोविंदराव फुलेंचे प्रतिमेचे पुजन व अभिवादन करतांना सह पत्नीक मिना दिपक शेवरे, तसेच विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी संयुक्त प्रतिमा पुजन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष नाभिक समाज माजी सचिव चिंतामण सिताराम जाधव यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जळगाव जिल्हा संघटक शाहीर विठ्ठल एकनाथ महाजन यांनी महात्मा फुलेंच्या जिवनावर पोवाडा व मनोगत सादर केले. बुध भुषण बुक स्टॉलचे संचालक अनिल मराठे यांनी फुलेंचे पुरोगामी विचार मांडुन जागृती निर्माण केली. छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे जिल्हा समन्वय रविंद्र पाटील, छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे शहर सचिव राजेंद्र मराठे, जितेंद्र पाटील, सचिन पाटील, रविंद्र सखाराम महाजन, लहुजी संघर्श सेनेचे अनिल पाचूंदे, लीला पाचुंदे, मिना शेवरे, मनिषा महाजन, उषा महाजन व बहुजन समाज उपस्थितीत होते. यावेळी उपस्थित मान्य वरांचे आभार दिपक शेवरे यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.