नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात नाशिकचे सुपुत्र सहाय्यक कामांडर नितीन भालेराव शहीद

0

नाशिक:  छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घडवून आलेल्या IED स्फोटात नाशिकचे सुपुत्र सहाय्यक कामांडर नितीन भालेराव शहीद झाले आहेत. या स्फोटात एकूण 10 जवान जखमी झाले आहेत. त्यात 4 जवानांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळतेय. सर्व जखमींना रात्री एअरलिफ्ट करण्यात आलं आहे. शहीद नितीन भालेराव हे नाशिकचे सुपुत्र आहेत. नाशिकच्या राजीव नगर भागात त्यांचे कुटुंबीय वास्तव्याला आहे.

ताडमेटला परिसरात नक्षलवाद्यांनी रात्री 2 IED स्फोट घडवून आणले. या स्फोटात कोबरा 206 बटालियनचे सहाय्यक कामांडर नितीन भालेराव यांच्यासह 1 अधिकारी आणि 8 जवान जखमी झाले. नितीन भालेराव यांनी अत्यंत गंभीर स्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तर अन्य 9 जवानांवर उपचार सुरु असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.