उकळत्या दुधामध्ये तुळशीची पाने घालून त्याचे सेवन केल्याने होतात मोठे फायदे ; कसे ते जाणून घ्या

0

तुळशीच्या पानाचे खूप आरोग्यदायी फायदे आहेत. आयुर्वेदिक काळापासून तुळशीच्या पानांचे महत्व सांगितले गेले आहे. तूळशीची पाने दुधात उकळल्याने अनेक मोठे आजार दूर होतात. मात्र, हे दूध केव्हा आणि कसे प्यावे ते जाणून घेणे गरजेचे आहे. तुळशीची पाने अनेक गुणांनी समृद्ध असतात. कोणत्याही प्रकारे तुळशीचा वापर करा, त्याचा आरोग्याला फायदाच होतो. तसे, आपल्याला रोगामध्ये तुळशीची पाने कशी वापरायची हे माहीत असणे गरजेचे आहे. तुळशीची पाने रोज दुधात उकळवून प्यायल्यास या मोठ्या आजारांपासून सहज मुक्तता मिळू शकते. जाणून घेऊया त्याबद्धल…

 

आपल्याला रोजच्या दैनंदिन कामात आणि कार्यालयीन ताणामुळे किंवा कामाच्या ओझ्यामुळे जर आपण बर्‍याचदा ताणाव किंवा नैराश्यात असतो. त्यावेळी तुम्ही जर तुळशीची पाने दुधात उकळून प्या. त्यामुळे तुमचा मानसिक तणाव आणि चिंता दूर होतात. किशोरवयीन मुला – मुलींना काही प्रमाणात तणाव असतो म्हणजे करियर, अभ्यास या सगळ्या गोष्टींचा भार हा मुलांवर पडत असतो. त्यामुळे ते सतत कोणत्या ना कोणत्या तणावात आढळतात. दररोज झोपताना एक कप चहा सोबत तुळशीची पाने घेतल्याने झोप व्यवस्थित लागते.

दमाचे त्रास दूर होण्यास मदत होते—

milk2

श्वासोच्छवासाची समस्या, दमा यासारख्या आजाराने तुम्हाला त्रास होत असेल तर तुळशीची पाने दुधात उकळवून घ्या. असे केल्याने दम्याचा रुग्णांना या फायदा होईल. श्वास घेण्याचा त्रासही कमी होतो.लहान मुलांना तर तुळशीची पाने खाण्यास देणे जास्त फायदेशीर आहे.

मायग्रेशन च्या समस्या दूर होतात—-

milk3

तुळशीची पाने दुधात उकळवून प्यायल्याने डोकेदुखी किंवा मायग्रेनसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. तुळशीच्या दुधाचे नियमित सेवन केल्यास ही समस्या मुळापासून दूर होते.

मुतखडा—

लहान वयापासून ते मोठ्या लोकांपर्यंत अनेकांना मूतखडा याचा त्रास जाणवू शकतो त्यावेळी त्यावर योग्य वेळी योग्य उपाय करणे जास्त फायदेशीर ठरते आहे. जर एखाद्या व्यक्तीला मूतखड्याचा त्रास असेल तर त्याने रिकाम्या पोटात नियमितपणे तुळशीचे दूध प्यावे. असे केल्याने मूत्रपिंडातील मूतखड्याची समस्या दूर होतेच, शिवाय वेदना दूर होतात.

Leave A Reply

Your email address will not be published.