महात्मा ज्योतीबा फुलेंनी बहुजन समाजाला दिशा देण्यासोबतच अंधश्रध्दा दुर करण्याचे अतुलनीय केले कार्य

0

 खामगांव : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले हे थोर विचारवंत आणि समाज सुधारक होते. त्यांनी प्रतिकुल परिस्थितीमध्ये शिक्षणाची ज्योत पेटवुन क्रांती घडवुन आणली. शिक्षणामुळे स्वतःसह देशाची, परिवाराची प्रगती होवु शकते हे त्यांनी लोकांना पटवुन सांगितले. महात्मा ज्योतीबा फुलेंनी बहुजन समाजाला दिशा देण्यासोबतच समाजातील अंधश्रध्दा दुर करण्याचे अतुलनीय कार्य केले. महात्मा फुलेंनी दाखविलेल्या आदर्श मार्गाचा प्रत्येकाने आपल्या जीवनात अंगीकार केल्यास जीवनाचा उध्दार होवु शकतो असे प्रतिपादन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी कले. दि.28 नोव्हेंबर 2020 रोजी जनसंपर्क कार्यालय येथे महात्मा ज्योतीबा फुले यांची पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम पार पडला. त्याप्रसंगी त्यांनी उपरोक्त प्रतिपादन केले.

यावेळी माजी नगराध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने,तालुकाध्यक्ष डाॅ.सदानंद धनोकार,शेगांव तालुका काॅंग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय काटोले, नगरसेवक किशोरआप्पा भोसले, माजी प्रशासक पंजाबरावदादा देशमुख, माजी जि.प.सदस्य सुरेशसिंह तोमर, पत्रकार प्रशातबाप्पु देशमुख,बबलु पठान,रोहित राजपुत सह आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पत्रकार प्रशातबाप्पु देषमुख यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, फुले दाम्पत्यांनी बहुजन समाजासाठी  केलेले कार्य हे समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी स्त्री शिक्षणासाठी पुढाकार घेउन महिलांना शिक्षणाचे दालन खुले करुन दिले. अंधश्रध्दा, कर्मकांडाविरुध्द लढा देउन सर्वांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहचवली असे त्यांनी सांगितले.

पंजाबरावदादा देशमुख यांनी आपल्या भाशणात सांगितले की, महात्मा फुलेंना सावित्रीबाई फुलेंची समर्थ साथ लाभली. त्यांनी समाज कार्यासाठी स्वतःला वाहुन घेतल्यामुळेच लोकांनी त्यांना महात्मा ही उपाधी दिली असे त्यांनी सांगितले.

नगरसेवक किशोरआप्पा भोसले यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, महात्मा फुले हे समाजासाठी दिशादर्षक होते. ते एक थोर विचारवंत होते. त्यांनी समाजातील जातीभेद,अनिश्ठ प्रथा नश्ट करुन समाज प्रबोधन करुन सामाजिक परिवर्तन घडवुन आणले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावणारे शिवरायांवर पहिला पोवाडा लिहणारे महात्मा ज्योतीबा फुलेंचे कार्य हे समाजासाठी दिषादर्षक  असल्याचे त्यांनी सांगितले.

सर्वप्रथम माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा व माजी नगराध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने यांच्या हस्ते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. तद्नंतर उपस्थितांनी सुध्दा क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी महात्मा ज्योतीबा फुलेंचा विजय असो, जय ज्योती-जय क्रांती अश्या घोषणा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे  आभार प्रदर्शन तालुकाध्यक्ष डाॅ.सदानंद धनोकार यांनी केले.

कार्यक्रमाला अमित भाकरे, सुधीर कस्तुरे, मनोज वानखडे,फंदाट, हाफीज साहेब, गुडडु मिरचलीवाला, नारायण बाठे, राजेष इंगळे, नारायण माखनकर, नागेश टोले, विषाल कवठेकर,सैयद बबलु  यांच्यासह काॅंग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.