‘सीरम’ने तयार केलेल्या ‘कोविशिल्ड’बाबत पुनावालांनी केली ‘ही’ खूप मोठी घोषणा

0

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल शनिवारी पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटला भेट देऊन करोना लसीच्या सद्यस्थितीबाबत माहिती घेतली. या दौऱ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते.  मोदींनी भेट दिल्यानंतर सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधानांच्या भेटीविषयी माहिती दिली. आजच्या भेटीत करोनावरील लस आणि लसीकरण याबाबत पंतप्रधान मोदी यांच्यासोबत सखोल चर्चा झाली, असे पूनावाला यांनी नमूद केले व करोनावरील लसीचे वितरण सर्वप्रथम भारतात होणार, अशी खूप मोठी घोषणा त्यांनी यावेळी केली.

करोना लसीच्या स्थितीची माहिती जाणून घेण्यसाठी पंतप्रदान नरेंद्र मोदी यांनी करोना प्रतिबंधक लस निर्मितीची परवानगी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळाल्यानंतर जुलै 2021 पर्यंत सुमारे 10 कोटी लसीच्या डोसची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट संस्थेचे असेल. शिवाय दरमहा पाच ते सहा कोटी डोसची निर्मिती करू शकतो; हळुहळू ते प्रमाण वाढवण्यात येईल, अशी माहिती “सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी दिली.

विशेषत: लस निर्मिती झाल्यानंतर त्याची किंमत, वितरण, उपलब्धता आणि महत्त्वाचे म्हणजे परवाना (लायसन्स) या सगळ्या विषयावर या भेटीत चर्चा झाल्याचे पुनावाला यांने नमूद केले. तसेच कमी कालावधीत जास्तीतजास्त डोसची निर्मिती संस्थेतर्फे करण्याचा प्रयत्न राहील. याशिवाय वेगवेगळ्या तापमानाला लस टिकून, सुरक्षित राहील याचीही सज्जता, नियोजन करणार असल्याची खात्रीही संस्थेतर्फे पंतप्रधानांना दिल्याचे पुनावाला म्हणाले.

सुरूवातीच्या टप्प्यात ज्यांना लस द्यायची आहे, त्यांचा वयोगट निश्‍चित करावा लागणार आहे. त्यानंतर 18 पेक्षा कमी असलेल्या लहान मुलांच्या वयोगटाचा विचार केला जाणार केला जाऊ शकतो. अर्थात हे सगळे नियोजन केंद्राच्या आरोग्य मंत्रालयाकडूनच होणार असून, त्यांच्या मागणीनुसार आणि नियोजनानुसार पुढील पावले उचलली जातील.

Leave A Reply

Your email address will not be published.