भरधाव वेगाने जाणारी कार पलटी ; १३ जण जखमी

0

हिंगोणा गावाजवळील घटना ; एक गंभीर
हिंगोणा ता .यावल – भरधाव वेगाने जाणार्या कारच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला पलटी होऊन झालेल्या अपघातात १३ जण जखमी झाल्याची घटना हिंगोणा गावाजवळ घडली असून यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते . याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि ,

हिंगोणा गावाजवळ बुरहानपुर अंकलेश्वर रस्त्यावर अडावद कडुन बऱ्हाणपूरकडे जाणाऱ्या मोहहरदा येथील एमपी ०९ बीसी ३६०८ या गाडीमध्ये दहा जण एका कार्यक्रमासाठी गेले होते. हे हिंगोण गावाजवळ भरधाव वेगात गाडीवरील ताबा ड्रायव्हरचा गेल्यामुळे ड्रायव्हर साईडला ही गाडी आऊटसाईड पलटी झाली. त्यात ड्रायव्हरसह १२ जण जखमी झाले असून एक गंभीर अवस्थेत आहे . जखमींना परिसरातील नागरिकांनी तात्काळ फैजपुर येथे खाचणे हॉस्पिटलमध्ये औषध उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

फैजपूर पोलीस स्टेशनचे पोलिसांनी एपीआय प्रकाश वानखेडे यांच्या सुचनेवरून हवालदार विनोद पाटील . सुरदास . भोई . होमगार्ड धनगर पो. पा . दिनेश बाविस्कर घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन जखमींना उपचारा साठी हलवण्याचे कामात मदत केली आहे. याच जागेवर काही अंतरावर गेल्या वर्षी चिचोली मेहून येथील एका गाडीला राखेचा भरुन जाणाऱ्या डंपरने जबर ठोस दिली होती . त्यात दहा ते अकरा जण दगावले होते त्या परिसरात ही घटना घडली असून हिंगोणा सांगवी भालोद परिसरातील नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेतली.
जखमींची नावे पुढीलप्रमाणे –
सकीनाबी शेख रशीद वय 45, नजमाबी शेख रफीक वय 50, आक्सीका इम्रान पटेल वय 20, आलीया पिंजारी वय 10 रा. पिंपळगाव बसवंत नाशिक, शमीम शेख असलम वय 30 रा. बऱ्हाणपूर , नजाबी शेख पिंजरी वय 50 रा. सुरत, रेहान शेख वय 6, फातीमाबी मुनीर खान वय 50 रा. बऱ्हाणपूर, सईदा सत्तार मन्सुरी वय 50, इसरतबी शेख रहीम पिंजारी वय 25,नसीमबी शेख गफूर, यास्मीन जाकीर पिंजारी, अनज जाकीर पिंजारी वय 12, असे 13 जखमींची नावे आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.