चाळीसगावात एकावर गावठी पिस्तुलाने गोळीबार ; एक गंभीर जखमी

0

शहर गोळीबाराने पुन्हा हादरले ; दोन अज्ञात हल्लेखोर फरार
चाळीसगाव :– शहरात सायंकाळी एका टपरीवर बसलेल्या तरुणावर दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करून एकाला गंभीर जखमी केल्याची घटना घडली असून गोळीबाराने चाळीसगाव शहर हादरल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि ,
चाळीसगाव शहरातील हुडको परिसरात रजा नगर मध्ये मदिना मज्जित जवळ बंबईया उर्फ जुबेर शेख वय वर्ष 25 राहणार हुडको नगर चाळीसगाव हा मदीना मशीद जवळील टपरीवर बसला असता , त्या ठिकाणी यामाहा एफ झेड या रेसर मोटारसायकलवर, टी शर्ट घातलेले दोन अज्ञात युवकांनी गावठी कट्ट्याने जुबेर याच्यावर फायरिंग केली. यात तो गंभीर जखमी झाला . जुबेर यास तात्काळ शहराच्या देवरे हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले असून बंबईया उर्फ जुबेरच्या डाव्या मांडीला गोळी लागली असून , त्यावर दवाखान्यात उपचार सुरु आहे.


याबाबत समजलेली माहिती अशी की बंबईया उर्फ जुबेर हा हुडको परिसरातील मदिना मज्जित जवळील एका टपरी जवळ बसला असता संध्याकाळी चार साडेचारच्या सुमारास यामा एफ झेड य या रेसर मोटारसायकलवर दोन युवक टी-शर्ट घातलेले आले आणि त्यांनी जुबेर वर गावठी कट्टा ने गोळीबार केला .
आणि तेथून हल्लेखोर लगेच मोटारसायकल ने पसार झालेत. असे परिसरातील युवकांच्या माहितीवरून कळाले.
याबाबत अधिक माहिती घेतली असता कळाले की,मागील एक महिन्यापूर्वी ही ह्याच बंबईया उर्फ जुबेर शेखवर नागदरोड वरील हैदर गॅंगने हल्ला केला होता . या हल्ल्याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हाही दाखल आहे. या गुन्ह्यातील सहा आरोपी पैकी चार आरोपी अजूनही जळगाव सबजेल येथे अटकेत असून त्यातील दोन आरोपी हे नुकतेच जामिनावर सुटून आले आहेत.
या गंभीर घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव विभागीय पोलिस उपअधीक्षक सचिन गोरे , चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय कुमार ठाकुरवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन परीस्थितीचा आढावा घेतला.
या घटनेबाबत चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे,या गुन्ह्याचा तपास चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय कुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अॆ पी आय ए एन सय्यद व पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश उबाळे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.