शेंदुर्णी येथे संत कडोजी महाराजांचा जयघोष करत यंदा फक्त ५ पावले ओढला रथ

0

रथोत्सव यंदा मात्र करोनामुळे साधेपणाने साजरा
शेंदुर्णी ता.जामनेर – खान्देशचे प्रति पंढरपुर म्हणुन प्रसिद्ध असलेल्या शेंदुर्णी नगरीचा संतश्रेष्ठ कडोजी महाराज यांनी सुरू केलेल्या २७५ वर्षांची परंपरा असलेला वैकुंठ चतुर्दशीला निघणारा रथोत्सव यंदा मात्र करोनामुळे साधेपणाने साजरा करण्यात आला. संपुर्ण शहरातुन दिमाखात निघणारा रथ यंदा फक्त ५ पावले ओढण्यात आला.

दुपारी रथाच्या घरात ब्रम्हवृंदांच्या वेदमंत्रोच्चारात,मंगलवाद्यांच्या सुरात दुपारी १२ वाजता संतश्रेष्ठ कडोजी महाराज संस्थानचे गादीवारस ह.भ.प.शांताराम महाराज भगत सौ.शारदा भगत,शेंदुर्णीच्या नगराध्यक्षा सौ.विजया खलसे अमृत खलसे,शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख पंडित जोहरे सौ.रजनी जोहरे,नगरसेविका सौ.वृषाली गुजर योगेश गुजर यांच्या हस्ते विधीवत पुजा अभिषेक करण्यात आला. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल माजी सरपंच सागरमल जैन, शेंदुर्णी सह.जिनिंग प्रेस चे चेअरमन दगडु पाटील, माजी पं.स.सदस्य सुधाकर बारी ,राजेंद्र पवार, भानुदास चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.राष्ट्रवादी चे नेते संजयदादा गरुड व जि.प.सदस्या सौ.सरोजिनी गरुड यांनी रथाचे दर्शन घेतले.दरम्यान यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत दै.लोकशाही च्या लोकारोग्य या दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले.


तदनंतर रथाची पुजा व आरती करण्यात आली.भगवान श्री.त्रिविक्रम महाराज की जय..,संत कडोजी महाराज की जय.. या भक्तीभावाने करोनाच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता,प्रशासनाने दिलेल्या अटी व नियमानुसार यंदा रथ गावातुन न फिरवता फक्त ५ पावले ओढण्यात आला.परंपरेनुसार बाकीचे सर्व धार्मिक विधी ,भजन कीर्तन, आदी दिलेल्या परवानगीनुसार पार पाडले जात आहे. रथोत्सवाच्या निमित्ताने सोन नदीच्या काठावर भरणारी भव्य यात्रा सुद्धा रद्द करण्यात आली आहे. रथ आकर्षक झेंडु गुलाबाच्या फुलांनी माधवबाबा भक्त मंडळाच्या वतीने सजविण्यात आला होता.भाविक तेथे जाऊन दर्शन घेत होते.यंदा पहिल्यांदाच अतिशय साधेपणाने रथोत्सव साजरा झाला.

याप्रसंगी तुषार भगत,ह.भ.प.शिवाजी महाराज भगत, ह.भ.प.कडोबा माळी, ह.भ.प.रामेश्वर महाराज कोळी, ह.भ.प.भागवत महाराज हिवाळे ,नारायण गुजर,निंबाजी भगत,प्रल्हाद भगत,विठ्ठल महाराज महाले,शिवराम महाले,देवराम महाले,शरद महाले,रमण मिस्तरी,वामन सकट,चोपदार विजय सोनार,गजानन चव्हाण व मान्यवर ,भाविक उपस्थित होते.
दरवर्षी हजारो भाविकांच्या उपस्थितीत शहरातुन निघणारा रथोत्सव यंदा प्रथमच करोना मुळे फक्त ५ पावले ओढुन जागेवर ठेवण्यात आला. यावेळी पहुरचे पो.नि.राहुल खताळ,पोउनि. अमोल देवडे,संदिप चेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस, होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
यंदा रथ आपल्या दारी न आल्याने असंख्य भाविकांच्या डोळ्यात पाणी आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.