बीएचआर पतसंस्थेत अपहारप्रकरणी रात्री उशिरा चौघे ताब्यात

0

 पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई ; आणखी ३ दिवस चौकशीचा ससेमिरा सुरु राहणार 

जळगाव ;– येथील बीएचआर मल्टी स्टेट कोऑपरेटीव्ह बँकेतील अपहार प्रकरणी पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या १३५ जणांच्या पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून चौकशी करिता  रात्री उशीरापर्यंत बीएचआर संस्थेचे सीए धरम सांखला, महावीर वाणी, ठेवीदार संघटनेचे विवेक ठाकरे व बीएचआर संस्थेतील कर्मचारी सुजीत वाणी या चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

 

शहरातील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी-स्टेट कॉ ऑपरेटव्ही बँकेत झालेला अपहार, गुंतवणूकदारांची थकीत असलेली देणी न देण, त्याशिवाय संस्थेच्या मालमत्तेची कवडीमोल दराने झालेली विक्री याबाबत पुणे शहर व पुणे ग्रामाणी पोलीस ठाण्यात याआधीच दोन वेगवेगळे गुन्हे दाखल असून याच्या तपासात पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे पथकाने शुक्रवारी गुन्ह्याशी संबंधित बीएचआरचे अवसायक जितेंद्र कंडारे ( रा. शिवाजीनगर), उद्योजक सुनील देवकीनंदन झंवर (रा. ५२ सुहास कॉलनी जयनगर), महावीर जैन, धरम सांखला (रा. शिवकॉलनी) आणि ठेवीदार संघटनेचे विवेक ठाकरे (रा. देवेंद्र नगर) यांच्या घरांवर छापे टाकले. कारवाईत पथकाकडून संबधितांचे कार्यालय, फर्म यांचीही चौकशी करण्यात आली. उशीरापर्यंत पथकाकडून चौकशी सुरु होती. सलग तीन दिवस ही चौकशी चालणार असल्याची विश्‍वसनीय माहिती मिळाली आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.