1 डिसेंबरपासून होणाऱ्या ‘या’ बदलांचा सर्वसामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम

0

१ डिसेंबर २०२० पासून भारतात मोठे बदल होणार आहेत. या बदलांचा सामान्यांच्या जिवनावर मोठा परिणाम जाणवणार आहे.  यामध्ये RTGS, रेल्वे आणि गॅस सिलिंडरशी संबंधित अनेक नियम बदलले जातील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) संबंधी नियम बदलले आहेत. हे नियम कॅश ट्रान्सफर संबंधित आहेत. त्याशिवाय सरकारी तेल कंपन्या दर महिन्याला गॅसचे दर अद्यतनित करतात. नवीन नियामांमध्ये एकीकडे दिलासा मिळेल, तर दुसरीकडे काही गोष्टींची काळजी न घेतल्यास आर्थिक नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता आहे.

RTGS सुविधेचा फायदा

डिसेंबरपासून तुमची बँक पैशाच्या व्यवहाराशी संबंधित हा नियम बदलणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) 24x7x365 उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली. हा निर्णय डिसेंबर 2020 पासून लागू होईल. याचा अर्थ असा की आता आपण RTGS मार्फत चौवीस तास पैसे ट्रान्सफर करू शकतात. सध्या RTGS सिस्टम महिन्यातील दुसरा आणि चौथा शनिवार वगळता आठवड्यातील सर्व कामकाजाच्या दिवशी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत उपलब्ध आहे.

प्रीमियममध्ये करू शकता बदल

आता 5 वर्षानंतर विमाधारक प्रीमियमची रक्कम 50 टक्क्यांनी कमी करू शकेल. म्हणजेच, अर्धा हप्ता देऊनही तुम्ही पॉलिसी चालू ठेवू शकता.

1 डिसेंबरपासून चालणार नवीन ट्रेन

भारतीय रेल्वे 1 डिसेंबरपासून अनेक नवीन गाड्या चालवणार आहे. कोरोनात अनेक स्पेशल ट्रेन सुरू करण्यात आल्या होत्या. आता 1 डिसेंबरपासून काही गाड्या सुरू होणार आहेत. यात झेलम एक्सप्रेस आणि पंजाब मेल या दोघांचा समावेश आहे. दोन्ही गाड्या सामान्य श्रेणी अंतर्गत चालवल्या जात आहेत. 01077/78 पुणे-जम्मूतवी पुणे झेलम स्पेशल आणि 02137/38 मुंबई फिरोजपूर पंजाब मेल स्पेशल दररोज धावतील.

एलपीजीच्या किंमती बदलतील

दर महिन्याच्या पहिल्या तारखेला सरकार एलपीजी सिलिंडरच्या किंमतींचा आढावा घेते. म्हणजेच 1 डिसेंबर रोजी देशभरात स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमती बदलतील. गेल्या महिन्यांत या किंमतींमध्ये कोणताही बदल झाले नव्हते.

Leave A Reply

Your email address will not be published.