टेकवाडे फाटयावर उजवा कालव्यात पिकअप गाडी पलटली ; ३ जखमी

0

भडगाव (प्रतिनिधी) : भडगाव तालुक्यातील वाडे येथून जवळच असलेल्या टेकवाडे,बहाळ फाटयावरील वळणाच्या रस्त्यावर जामदा उजव्या कालव्यात पिकअप गाडीच्या डाव्हरचा टेरिंगवरील ताबा सुटल्याने पिक अप गाडी जामदा उजव्या कालव्यात उलटल्याने डाव्हरसह  ३ जण किरकोळ जखमी झाले आहेत.

नावरे येथील पांडुरंग सोनवणे यांच्या मालकीची पिकअप गाडी क्रमांक एच १२एम व्ही.६०१२क्रमांकाची छोटी पिकअप गाडी ही नावरे गावाहून सकाळी ८वाजता चाळीसगांव येथे मक्याचे भुणके कणीस घेऊन जात असताना टेकवाडे बहाळ फाट्यावरील वळणाच्या रस्त्यावर डायव्हरचा टेरिंगवरील ताबा अचानक सुटल्याने पिक अप वाहन रस्त्यावरून थेट १५फूट खोल असलेल्या जामदा कालव्यात उलटल्याने या अपघातात डाव्हरसह तीनजण किरकोळ जखमी झाले आहेत . दैवयोगाने ते या विचीत्र अपघातात ते बालबाल बचावले . यावेळी ऋषीपांथा येथे दुरुस्ती काम सुरू होते . तेथे हा आवाज गेल्याने बहाळ,टेकवाडे येथील ग्रामस्थांनी अपघाताच्या स्थळी धाव घेत मदत करून या जखमींंना बाहेर काढले.यानंतर बहाळ येथील दिपक परदेशी यांनी त्यांच्या जेसीबीच्या साहयाने गाडी कालव्यातून बाहेर काढून मोठी मदत केली.

Leave A Reply

Your email address will not be published.