सोने आणि चांदीच्या दरात वाढ ; जाणून घ्या आजचा नवीन भाव

0

मुंबई :  गेल्या आठवड्यात नफावसुलीने पडझड झालेल्या सोने आणि चांदीच्या दरात आज वाढ झाली आहे.  सोन्याच्या भावात १९७ तर चांदीच्या भावात १६२ रुपयांची वाढ झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सध्या सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ४८७१० रुपये आहे. तर चांदीचा भाव एक किलोला ६०००५ रुपये आहे.  आज जागतिक कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव प्रती औंस ०.१० टक्क्यांनी कमी झाला असून तो १८९०.१० डॉलर आहे.

मागील दोन सत्रात नफेखोरीचा दबाव सहन करणाऱ्या सोने आणि चांदीने बुधवारी यू-टर्न घेतला होता. बाजार बंद होताना सोने ४८५८५ रुपयांवर स्थिरावले. तर चांदीचा भाव ५९६२१ रुपयांवर बंद झाला होता. त्यात १४९ रुपयांची वाढ झाली होती. मंगळवारी सोने आणि चांदीला नफावसुलीचा फटका बसला होता. बाजारात सोने ८०० रुपयांनी तर चांदी १००० रुपयांनी स्वस्त झाली होती. त्यामुळे सोने ४९००० रुपयांखाली गेले होते.

goodreturns या वेबसाईटनुसार आज गुरुवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४९८५० रुपये आहे. २४ कॅरेटचा भाव ५८८५० रुपये आहे. पुण्यात २२ कॅरेटचा भाव ४७८५० रुपये असून २४ कॅरेटसाठी आजचा सोन्याचा भाव ४८८५० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेटचा भाव ४७६६० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ५१९९० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेटसाठी ग्राहकांना ५००९० रुपये मोजावे लागतील. तर २४ कॅरेटचा भाव ५२४९० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेटचा सोन्याचा दर ४६०७० रुपये असून २४ कॅरेटसाठी ५०२५० रुपये आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.