वडोदा वनक्षेत्रात अवैध वृक्षतोड करणारे १४ संशयित आरोपींना एक दिवसाची वन कोठडी

0

कुऱ्हा काकोडा  : वडोदा वनक्षेत्र अंतर्गत असलेल्या राजुरा येथील कक्ष क्रमांक ५६५ मध्ये अज्ञात व्यक्तीने रात्री-अपरात्री जाऊन अवैध वृक्षतोड केली होती वनरक्षक राजुरा त्यांच्याकडील प्र. गु .डी ४/२०२० जारी करून भारतीय वन अधिनियम १९९७ चे कलम २६(१) गुन्हा नोंद करून वन गुन्ह्याचा तपास केला असता गुन्ह्यातील फरार संशयित आरोपी १) केशव तुकाराम वाघ रा. जोधनखेडा ता. मुक्ताईनगर २) भिकलाल प्रताप पावरा ३) मधु सिंग  लालसिंग  पावरा ४) रेमसिंग सिंग भारसिंग पावरा ५) कनसिंग रेमला पावरा ६) दुर्गासिंग प्रताप पावरा ७) कैलास वरशिंग पावरा ८) भाऊराव रेवजी पावरा९) किशोर लालसिंग पावरा१०)  जवानसिंग मंजी पावरा ११) वरसिंग भारसिंग  पावरा १२) मांगीलाल  शंकर पावरा १३) दिनेश  जवानसिंग पावरा १४) जगदीश काशीराम पावरा सर्व पावरी वाडा धुळे ता. मुक्ताईनगर यांना दिनांक 24 रोजी ताब्यात घेऊन अटक करण्यात आली व सदर संशयित आरोपींना 25 रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय मुक्ताईनगर येथे हजर केले असता न्यायालयाने सर्व संशयित आरोपींना एक दिवसाची वन कोठडी सुनावण्यात आली. असून सदर कारवाई दिगंबर पगार वनरक्षक प्रा धुळे विवेक होसिंग वनरक्षक जळगाव उमेश विभागीय वन अधिकारी दक्षता धुळे राजेश राणे वनक्षेत्र अधिकारी अतिक्रमण व निर्मूलन भुसावळ, अमोल चव्हाण वनपरिक्षेत्र अधिकारी वडोदा,वनपाल भावना मराठे, दिगंबर पाचपांडे, वनरक्षक विजय अहिरे ,डी एस पवार यांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली असून पुढील तपास वनपाल भावना मराठे करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.