1 डिसेंबरपासून सर्व रेल्वे होणार बंद? रेल्वे मंत्रालयाकडून मिळाले उत्तर

0

नवी दिल्ली – देशात मागील काही दिवसांपासून वाढणारा करोना रुग्णांचा आकडा आणि त्या पार्श्वभूमीवर उचलली जाणारी पावलं पाहता पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्याच्या अनेक चर्चांनी जोर धरला. त्यातच आता डिसेंबरच्या पहिल्या तारखेपासून रेल्वे सेवा बंद करण्याच्या चर्चाही सुरू झाल्याचे कानावर येत आहे. रेल्वे, कोविड-19 (COVID-19) स्पेशल ट्रेनसह, सर्व ट्रेन 1 डिसेंबरनंतर बंद करणार असल्याचा मेसेजमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून या संदर्भातील  व्हायरल होत आहेत. परंतु रेल्वे मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. सध्या सरकारची अशाप्रकारची कोणतीही योजना नसल्याचं सांगत रेल्वेने हा मेसेज संपूर्ण फेक असल्याचंही रेल्वेने म्हटलं आहे.

1 डिसेंबरनंतर ट्रेन सेवा बंद करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आला नाही, असं PIBFactCheck ने या व्हायरल मेसेजच्या सत्यता पडताळणीत म्हटलं आहे. कोरोना काळात देशभरात अनेक प्रकारचे फेक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अशात केंद्र सरकारच्या प्रेस इंफॉर्मेशन ब्युरोने अनेक व्हायरल मेसेजची पडताळणी करत त्याची सत्यता सर्वांसमोर आणली आहे. अशाप्रकारच्या खोट्या बातम्या पसरू नये यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.

जर तुम्हालाही कोणत्याही सरकारी योजना किंवा सरकारी योजनेच्या सत्यतेबाबत कोणताही संशय असल्यास, तुम्हीही ती माहिती पीआयबी फॅक्ट चेकसाठी पाठवू शकता. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म किंवा मेलद्वारे पीआयबी फॅक्ट चेकशी संपर्क करू शकता. व्हॉट्सऍपवरून 8799711259 संपर्क करू शकता. त्याशिवाय ट्विटरवर @PIBFactCheck फेसबुकवर PIBFactCheck आणि ईमेलद्वारे [email protected] ही संपर्क करू शकता. https://factcheck.pib.gov.in/ यावर अधिक माहिती घेऊ शकता.

Leave A Reply

Your email address will not be published.