भुसावळात मोटार अपघात प्राधिकरण न्यायालय चालणार ; शहरासह विभागातील पक्षकारांना दिलासा मिळणार

0
भुसावळ (प्रतिनिधी )- भुसावळ येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयात आता मोटार अपघात दावे चालविण्यात येतील. याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत. यापूर्वी शहर व विभागातील मोटार अपघात दावे जळगाव न्यायालयात चालविले जात होते. त्यांचे कामकाज आता भुसावळात होणार असल्याने विभागातील पक्षकारांना दिलासा मिळणार आहे. अपघाताच्या प्रकरणांमधील नुकसान भरपाईसाठी ज्यामध्ये मोटार वाहनाच्या वापरामुळे व्यक्तींना मृत्यू किंवा शारिरिक इजा पोचवणे किंवा एखाद्या त्रसस्थ व्यक्तीच्या मालमत्तेची हानी पोचवणे आदीं प्रकरणातील दाव्यांवर निर्णयासाठी मोटार अपघात दावा न्यायधिकरणाची स्थापना केली जाते. भुसावळ शहरात सन २०१४ मध्ये अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय मंजूर झाल्यानंतर मोटार अपघात दावा न्यायधिकारणही सुरु व्हावे, अशी मागणी होती. याबाबत वकिल संघाचे अध्यक्ष अॅड. तुषार पाटील यांनी आमदार संजय सावकारे यांच्या माध्यमातून शासनाकडे हा विषय लावून धरला होता. या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. यासंर्भात १२ नोव्हेंबर रोजी रात्रपत्रात प्रसिध्द झालेल्या अधिसूचनेनुसार आता भुसावळ अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात मोटार अपघात दावा न्यायाधिकरण सुरु होऊन कामकाज चालणार आहे. यामुळे शहरासह विभागातील पक्षकारांना दिलासा मिळणार आहे.
 
वेळ, प्रवासखर्च वाचेल,आमदार संजय सावकारे यांची मोलाची मदत
 
भुसावळ – न्यायालयात मोटार अपघात दावे चालविले जावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु होता. आमदार संजय सावकारे यांची मोलाची मदत मिळाल्याने हे प्रकरण मार्गी लागले. यामुळे भुसावळ विभागातील पक्षकारांना जळगाव जाण्याची गरज भासणार नाही. भुसावळातूनच कामकाज चालेल. वेळ व प्रवासाचा अतिरिक्त खर्च वाचेल.
 
अॅड. तुषार पाटील, अध्यक्ष, भुसावळ वकिल संघ.

Leave A Reply

Your email address will not be published.