साकळीत सर्दी,खोकल्याचे रुग्ण वाढले !

0

नागरिकांच्या आरोग्याची चिंता वाढली ; आरोग्य प्रशासनासमोर आव्हान

साकळी ता.यावल (वार्ताहर)- येथे सध्या दिवसेंदिवस थंडीचा जोर वाढत असून वातावरणात बदल झाल्यामुळे गावात सर्दी खोकला व तापाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असून अनेक घरांमध्ये किमान सर्दी खोकल्याचे रुग्ण आढळून येत आहे त्यामुळे गावातील नागरिकांच्या आरोग्याची चिंता वाढली असून गावात कोरोना परत येतो का ? अशी शंका नागरिकांकडूनव्यक्त केली जात आहे .एकूणच सर्दी.खोकला व इतर ताप सदृश्य आजारांनी डोके वर काढल्याने आरोग्य प्रशासना समोर सुद्धा मोठे आव्हान निर्माण झालेली आहे .
. गावात अनेक घरांमध्ये सर्दी, खोकला व इतर ताप सदृश्य आजारांचे रुग्ण आढळून आलेले आहे .. हे रुग्ण गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रासह खाजगी दवाखान्यात उपचार करीत आहे. जर का एखाद्याचा ताप कमी होत नसल्या स अथवा खोकल्याचा त्रास जास्त जाणवत असल्यास ते रुग्ण बाहेर गावी जाऊन उपचार घेत आहे.त्याचप्रमाणे गावात अधून- मधून टायफाईड, मलेरिया व इतर सदृश्य आजारांचे रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. जेव्हा जून व जुलै दरम्यान गावात कोरोनाचे खूप मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आलेले होते तेव्हा ऊनही चांगलेच तापत होते व नागरिकांनी सुद्धा काळजी घेतली होती तेव्हा त्यादरम्यान गावातील कोरोनाचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आलेला होता. मात्र आता या थंडीच्या काळात जर नागरिकांनी योग्य प्रकारे काळजी न घेतल्यास कोरोनाने ‘डोके ‘ वर काढले तर परिस्थिती फार भयावह होऊ शकते असेही आरोग्य प्रशासनाचे म्हणणे आहे .

नागरिकांनी मास्क वापरणे गरजेचेच – डॉ.सागर पाटील

गाव परिसराचा सध्या थंडीचे प्रमाण वाढत असल्यामुळे तापअदृश्य सह इतर आजारांनी डोके वर काढायला सुरुवात केलेली असून त्यापाठोपाठ कोरोना चा संसर्ग फैलू शकतो .त्याकरता नागरिकांनी बाहेर जातांना तोंडाला मास्क लावणे महत्वाचे आहे.त्यासोबत गरम पाणी व रोगप्रतिकारक काढा घेणे गरजेचे आहे .त्याचप्रमाणे मोठ्या शहरांकडे येणे-जाणे टाळावे .शक्यतो प्रवास करणे ही टाळावे.तसेच थंडी, ताप, खोकला यावर वेळीच उपचार करणेही गरजेचे आहे . असे साकळी प्रा.आ.केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सागर पाटील यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.