जळगाव जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये ७ डिसेंबरपर्यंत बंद राहणार -जिल्हाधिकारी

0

जळगाव –जिल्ह्यातील ९ वी ते १२ च्या शाळा महाविद्यालये , आश्रमशाळा  व वसतीगृह ७  डिसेंबर पर्यंत सुरू न करण्याचे आदेश  जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी काढले आहे . कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे . महाराष्ट्र शासनाच्या शालेय विभागाच्या आदेशानुसार सोमवारपासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू होणार होते . मात्र मुंबई , पुणे आदी ठिकाणच्या प्रशासनाने शाळा महाविद्यालये उघडण्याचा निर्णय लांबणीवर टाकल्याने जळगाव जिल्ह्यातही कोरोनाच्या पार्शवभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे.  सध्या जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असल्याचे दिसून आले आहे.परंतु अलीकडच्या काळातील रूग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता दुसर्‍या लाटेचा धोका अद्याप कायम असल्याचे दिसून येत आहे. यामुळे रूग्ण संख्येत वाढ होण्याची अर्थात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनातर्फे आवश्यक त्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.