रतनलाल सी. बाफना यांचे निधन – संध्याकाळी साडेपाच वाजता अंतिमसंस्कार

0

जळगाव प्रतिनिधी । आर. सी. बाफना ज्वेलर्सचे संचालक तथा शाकाहाराचे प्रणेते रतनलालजी चुनिलालजी बाफना(वय 86)  यांचे आज दुपारी निधन झाले. जळगाव जिल्ह्यासह देशातील अनेक सामाजिक कार्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.

*अंतिम संस्कार*:-
अंतिम संस्कार आज संध्याकाळी 5:30 वाजता *आर सी बाफना गोशाला* मध्ये परिवाराच्या उपस्थिति मध्ये केले जाणार आहे.

जळगावात एक छोटेसे दुकान टाकून सुवर्ण व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवणारे बाफना यांनी विश्वास, सचोटी, पारदर्शकता या बळावर जळगावातील सोने देशभर पोहचविले. एका छोट्या दुकानापासून मोठ्या शोरूमपर्यंतचा प्रवास करणारे बाफना यांनी या व्यवसायाच्या माध्यमातून शेकडोंना रोजगार उपलब्ध करून दिला.

हळूहळू हा व्यवसाय औरंगाबाद, नाशिक अशा वेगवेगळ्या शहरात बाफना ज्वेलरच्या शाखा सुरू केल्या. या सोबतच जळगावनजीक गोशाळा सुरू करून मुक्या गुरांना आधार दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.