दिलासादायक : जळगाव जिल्ह्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ९५ टक्क्यांहून अधिक ; पाहा आजची आकडेवारी

0

जळगाव (प्रतिनिधी) : जिल्‍ह्‍यात कोरोना वाढीचा प्रभाव मंदावला आहे. मागील दोन ते तीन दिवस दीडशेच्या घरात पॉझिटीव्ह रूग्‍ण आढळून आल्‍यानंतर आज नव्याने बाधा झालेल्‍या रूग्‍ण संख्येत मोठी घट झाल्याचं पाहायला मिळालं. जिल्‍ह्‍यात आज दिवसभरात केवळ ६७ पॉझिटीव्ह रूग्‍ण आढळून आले असून १५६ रूग्‍ण बरे होवून घरी परतले आहेत.

दरम्यान, आज जिल्ह्यातील ७ तालुक्यात एकही रुग्ण आढळून आलेला नाहीय.त्यामुळे ही मोठी दिलासादायक बाब आहे.

सलग चार- पाच आठवड्यांपासून जिल्‍ह्‍यातील कोरोनाचा उद्रेक कमी झाला आहे. रूग्‍ण संख्या कमी आढळून येत असून बरे होवून घरी जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यामुळे एकूण बाधित आणि बरे झालेल्‍या रूग्‍ण संख्येतील तफावत कमी झालेली आहे. आजअखेरपर्यंत जिल्‍ह्‍यात एकूण पॉझिटीव्ह रूग्‍णांची संख्या ५२ हजार ८६२ झाली आहे; तर बरे होवून घरी गेलेल्‍या संख्या ४५० हजार ४०८ वर पोहचली आहे. यामुळे जिल्‍ह्‍यासाठी हे दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान, आज जिल्‍ह्‍यात ४ जणांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार २५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

असे आढळले रूग्ण

जळगाव शहर – ४१, जळगाव ग्रामीण- ००, भुसावळ-०३, अमळनेर-०२, चोपडा-०९, पाचोरा-००, भडगाव-०१, धरणगाव-००, यावल-००, एरंडोल-००, जामनेर-०१, रावेर-०४, पारोळा-००, चाळीसगाव-०१, मुक्ताईनगर-०५, बोदवड-००, इतर जिल्ह्यातील-०० असे एकुण ६७ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे.

दरम्यान, जिल्ह्यात आता १ हजार १९६ रूग्ण कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. दिलासादायक बाब अशी की जिल्ह्यातील रिकव्हरी दर ९५.३६ वर पोहचला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.