जळगावात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू : गुन्हा दाखल

0

जळगाव । आज सकाळी उमाळे फाट्यानजीक  एमआयडीसी कंपनीत दुचाकीने कामावर जात असतांना ट्रकच्या जोरदार धडकेत ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. डिगंबर सोनू नेमाडे (वय-६५, रा. गजानन नगर, काशिनाथ लॉजजवळ) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान, ट्रकसह चालकास अटक करण्यात आली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

याबाबत सविस्तर असे की, डिगंबर नेमाडे हे एमआयडीसीतील भाग्यश्री प्लास्टिक कंपनीत कामाला आहे. नेहमीप्रमाणे आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास कंपनीत कामाला जात असतांना चिंचोली-उमाळे गावादरम्यान राधाकृष्ण लॉन जवळ समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. त्याच वेळी त्याच्या ओळखीच्या मित्रांनी त्यांना तातडीने शहरातील खासगी रूग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना गुलाबराव देवकर वैद्यकिय महाविद्यालयात रवाना केले. वैद्यकिय अधिकारी डॉ. सचिन अहिरे यांनी मयत घोषीत केले.

 

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. एमआयडीसी पोलीसांनी ट्रक ताब्यात घेतले असून चालकास अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपास सपोनि संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ. संतोष पवार, संदीप धनगर करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.