खडसेंसह महाविकास आघाडीतील सर्व पक्ष मिळून भाजपचे महाराष्ट्रातील वर्चस्व कमी करू

0

कराड । भाजपचे सोडचिट्टी देत एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रवेशानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खडसेंसह महाविकास आघाडीतील सर्व पक्ष मिळून भाजपचे महाराष्ट्रातील वर्चस्व कमी करू, असा विश्वास कराड येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.

 

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी माजी मुख्यमंत्र्यावर रोष दाखवला. त्यांना चांगली वागणूक मिळाली नाही. त्यांच्याबद्दल छळवाद झाला, असा त्यांनी आरोप केला. त्यांनी पक्षांतर केले आहे, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीतील प्रवेशासाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान, राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे पहिल्यांदाच आपल्या मूळगावी कोथळी गावी गेले होते. यावेळी ढोलताशांच्या गजरात आणि फटाक्यांची आतषबाजी करत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी नाथाभाऊंचं औक्षण करून त्यांचं घरी स्वागत केलं होतं. रक्षा खडसे या नाथाभाऊंच्या स्नुषा असल्या तरी त्या भाजपच्या खासदार आहेत. पक्ष बदलल्यानंतर खडसे गावी परतल्यानंतर त्यांचं रक्षा खडसे यांनी स्वागत केल्याने राजकीय वर्तुळात त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.